VIDEO : ‘ओए, मेनन! थेट पिचमध्येच धावतोय यार’, विराट कोहलीची अंपायरकडे तक्रार, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Feb 09, 2021 | 9:52 PM

इंग्लंडने टीम इंडियावर पहिल्या कसोटी सामन्यात 227 धावांनी विजय मिळवत कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यातला एक व्हिडीओ समोर आला आहे (Virat Kohli calls umpire Video Viral).

VIDEO : ओए, मेनन! थेट पिचमध्येच धावतोय यार, विराट कोहलीची अंपायरकडे तक्रार, व्हिडीओ व्हायरल
Follow us on

चेन्नई : इंग्लंडने टीम इंडियावर पहिल्या कसोटी सामन्यात 227 धावांनी विजय मिळवत कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यातला एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडच्या फलंदाजाची अंपायरकडे तक्रार करताना दिसत आहे. संबंधित घटना ही कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसातील आहे. इंग्लंडचा फलंदाज खेळपट्टीवर रनिंग करत असल्याची तक्रार कोहली अंपायरकडे करत आहे (Virat Kohli calls umpire Video Viral).

व्हिडीओत नेमकं काय दिसतंय?

इंग्लंडचा फलंदाज जोफ्रा आर्चर बॉलला डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला मारतो. त्यानंतर तो थेट खेळपट्टीवर धावून रन काढतो. यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या ऋषभ पंतच्या पाठीमागे विराट कोहली उभा असतो. विराट कोहली पुढे धावत येऊन अंपायरकडे तक्रार करतो. या व्हिडीओत कोहलीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतोय (Virat Kohli calls umpire Video Viral).

“ओए, मेनन, थेट पिचमध्ये धावतोय यार, काय चाललंय ते तर बघा”, असं विराट व्हिडीओत बोलताना दिसतोय. कोहली सारखंच रोहित शर्माचा देखील एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या व्हिडीओत रोहित खेळपट्टीवर फलंदाज धावत असल्याने नाराजी जाहीर करताना दिसत आहे.

खेळपट्टीवर धावण्यास मनाई का?

कसोटी सामन्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये खेळपट्टीवर भेगा पडतात. यामुळे फलंदाजी करण्यास अडचण निर्माण होते. यामुळे अंपायर्स खेळाडूंना पीचवरुन धावण्यास मज्जाव करतात. कारण पीचवरुन धावल्यास खेळपट्टीवरील भेगा उकरुन निघण्याची शक्यता असते. टीम इंडियाला चेन्नई टेस्टमध्ये चौथ्या डावात बॅटिंग करायची होती. त्यामुळे कॅप्टन विराट कोहलीने शंका व्यक्त करणं स्वाभिवक होतं. दरम्यान, टीम इंडियाच्या फलंदाजांना सामन्याच्या शेवटच्या दिवशी विशेष काही करता आले नाही. इंग्लंडच्या जॅक लीच आणि अनुभवी जेम्स अँडरसनच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा डाव 191 धावांवर आटोपला. यामुळे इंग्लंडचा 227 धावांनी शानदार विजय झाला.

हेही वाचा : India vs England 1st Test Highlights | कॅप्टन कोहलीची एकाकी झुंज अपयशी, इंग्लंडचा टीम इंडियावर 227 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी