IND vs NZ : 46 डॉट बॉल, 10 वर्षात पहिल्यांदा अशी गोलंदाजी, सुनील गावस्कर सुद्धा झाले फॅन, त्यांनी सांगितलं अंशुल कंबोजच्या गोलंदाजीचं सिक्रेट

IND vs NZ : टीम इंडियाने आज न्यूझीलंड विरुद्ध पहिला वनडे सामना जिंकून चांगली सुरुवात केली. या मॅचमध्ये एका 24 वर्षाच्या मुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या भेदक गोलंदाजीने नवीन अशा निर्माण झाल्या आहेत. काय आहे अंशुल कंबोजमध्ये असं?

IND vs NZ : 46 डॉट बॉल, 10 वर्षात पहिल्यांदा अशी गोलंदाजी, सुनील गावस्कर सुद्धा झाले फॅन, त्यांनी सांगितलं अंशुल कंबोजच्या गोलंदाजीचं सिक्रेट
Sunil Gavaskar-Anshul Kamboj
Image Credit source: AFP
| Updated on: Nov 04, 2026 | 10:30 PM

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज ऑकलंडच्या ईडन पार्कवर पहिला वनडे सामना झाला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात विजय मिळवत भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं ते 24 वर्षांचा युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने. पहिल्या वनडेत आपल्या घातक गोलंदाजीने त्याने सर्वांनाच हैराण केलं. न्यूझीलंड विरुद्ध अंशुल कंबोजने आपला 10 ओव्हरचा कोटा पूर्ण केला. त्याने 2 मे़डन ओव्हर टाकत 22 रन्स देऊन 2 विकेट काढल्या. अंशुल कंबोजच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे 10 ओव्हरमध्ये 60 चेंडू असतात. त्यात त्याने तब्बल 46 डॉट बॉल टाकले. त्याचा इकॉनमी रेट अवघा 2.20 होता. 2016 नंतर वनडे मध्ये 10 ओव्हरच्या संपूर्ण स्पेलमध्ये कुठल्याही भारतीय गोलंदाजाने दिलेल्या या सर्वात कमी धावा आहेत.

या मॅच विनिंग प्रदर्शनासाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर सुद्धा अंशुलच्या गोलंदाजीचे फॅन झाले आहेत. त्यांनी अंशुलच्या गोलंदाजीचं भरपूर कौतुक केलं. सोनी स्पोर्ट्सवर बोलताना गावस्कर यांनी अंशुल कंबोजच्या गोलंदाजीचा वेग आणि फिटनेस मध्ये झालेल्या सुधारणेकडे लक्ष वेधलं. “अंशुलने पहिलीच मेडन ओव्हरने सुरुवात केली. त्याचा चेंडू चांगला स्विंग होत होता आणि वेगाने निघत होता” असं गावस्कर म्हणाले.

Loading...

स्पीड 127 ते 130 किलोमीटर प्रतितास

“मागच्यावर्षी आपण त्याला इंग्लंडमध्ये पाहिलं होतं. त्यावेळी त्याच्या गोलंदाजीचा स्पीड 127 ते 130 किलोमीटर प्रतितास होता. पण आता तो 135 पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करतोय. याचा अर्थ आहे की, त्याच्या फिटनेसमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. फिटनेसमध्ये सुधारणा झाल्याने गोलंदाजीत कमालीचा बदल पहायला मिळतोय” असं सुनील गावस्कर यांचं निरीक्षण आहे.

एकही चेंडू मिडिल आणि लेग स्टम्पवर टाकला नाही

गावस्कर यांनी अंशुलच्या गोलंदाजीतील लाइन लेंथचं कौतुक केलं. “जेव्हा तुम्हाला गोलंदाजीची लय सापडते, तेव्हा नो-बॉल तुम्ही टाकणार नाही हा विश्वास तुम्हाला असतो आणि तुमचा स्पीड आपसूकच वाढतो. अंशुलने आपल्या संपूर्ण स्पेलमध्ये एकही चेंडू मिडिल आणि लेग स्टम्पवर टाकला नाही. तो सतत ऑफ स्टम्प किंवा त्याच्या बाहेर चेंडू टाकत होता”

अचूक लाइन-लेंथ

आधी अंशुलच्या गोलंदाजीचा वेग असा होता की, फलंदाज सहज ‘ऑन द अप’ शॉट खेळायचे. पण ऑकलंडच्या उसळी घेणाऱ्या आणि सीमिंग पीचवर त्याच्या अचूक लाइन-लेंथमुळे फलंदाजांना फटके खेळण अशक्य बनलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us