IND vs NZ: त्या दोघांचं कौतुक करताना थकले नाही पण सिराजचं नाव घेताच…दुसऱ्या कसोटीतील Playing Xi बद्दल मॉर्केल काय म्हणाले?

Morne Morkel On IND vs NZ 2nd Test Playing Xi: भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यात तरी मोहम्मद सिराजला संधी मिळणार की नाही हे आता स्पष्ट केले आहे,

IND vs NZ: त्या दोघांचं कौतुक करताना थकले नाही पण सिराजचं नाव घेताच...दुसऱ्या कसोटीतील Playing Xi बद्दल मॉर्केल काय म्हणाले?
| Updated on: Nov 26, 2026 | 9:44 AM

Morne Morkel On Mohmmed Siraj: क्राइस्टचर्च येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला भारतीय संघातून वगळण्यात आले. यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यातच आता दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी, भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी सिराजबद्दल प्रश्न विचारला असता काय उत्तर दिले ते पाहा..

मॉर्न मॉर्केलने सांगितले की, “सर्व गोलंदाज निवडीसाठी उपलब्ध आहेत आणि अंतिम निर्णय उद्याच्या सामन्यापूर्वी घेतला जाईल. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वेग कमी झाल्याबद्दल अंशुल कंबोजला पूर्णपणे दोष देऊ नये, कारण खेळपट्टीमुळे वेग कमी झाला होता. आपल्या शिस्तबद्ध कामगिरीने भारताला सामन्यावर नियंत्रण मिळवून देणाऱ्या अंशुल कंबोज एकट्याला दोष देणे चुकीचे ठरेल.

Loading...

मॉर्केल म्हणाले की, “अंशुलने उत्कृष्ट कामगिरी केली. बाहेरून अंदाज लावणे खूप कठीण आहे. काही दिवसांपूर्वी ड्रेसिंग रूममध्ये बसलो असताना, जर यष्टीरक्षकाला दोन मीटर उंच गोलंदाजाचा सामना करावा लागत असेल, तर ती चिंतेची बाब आहे. खेळपट्टीचा वेग सुरुवातीलाच खूप कमी झाला आणि त्यामुळे गोलंदाजांचा वेगही मंदावला. खेळपट्ट्या सपाट असू शकतात, पण त्यांचा वेग कमी व्हावा असे तुम्हाला वाटत नाही. गोलंदाजांनी नवीन कुकाबुरा चेंडूंचा पुरेपूर फायदा घेणे आवश्यक आहे. तुम्हाला नवीन चेंडूचा फायदा घ्यावा लागेल. कधीकधी तुम्हाला धाडसी होण्याची गरज असते. सर्व गोलंदाज तंदुरुस्त आणि उपलब्ध आहेत, आणि आम्ही उद्या निर्णय घेऊ.  मोहम्मद सिराज चांगली गोलंदाजी करत आहे. कधीकधी निर्णय घेणे कठीण असते. माझे त्याच्याशी बोलणे झाले. निवड आपल्या नियंत्रणात नसते.”

ते म्हणाले की “प्रत्येकाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा असतो. प्रत्येक खराब सत्रानंतर आपण खचून जाता कामा नये. आपल्याला प्रत्येक सत्राचे विश्लेषण करून सर्वोत्तम क्रिकेट खेळावे लागेल. गुरनूर ब्रारदेखील संधीच्या उंबरठ्यावर आहे आणि सर्व योग्य गोष्टी करत आहे. त्याला फक्त संधीसाठी तयार राहण्याची गरज आहे. त्याला शंभर टक्के तयार ठेवणे हे माझे काम आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us