IND vs NZ : शेवटच्या दोन वनडेत भारतावर मात करण्यासाठी न्यूझीलंडच्या टीममध्ये 5 चेंडूत 5 विकेट घेऊन इतिहास रचणाऱ्या बॉलरची एन्ट्री

IND vs NZ : भारताने टी20 सीरीज 3-2 ने जिंकली. टीम इंडिया आता पाच वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे. टी20 पाठोपाठ वनडे सीरीज भारताकडे जाऊ नये यासाठी न्यूझीलंडने शेवटच्या दोन वनडेसाठी आपली टीम बदलली आहे.

IND vs NZ : शेवटच्या दोन वनडेत भारतावर मात करण्यासाठी न्यूझीलंडच्या टीममध्ये 5 चेंडूत 5 विकेट घेऊन इतिहास रचणाऱ्या बॉलरची एन्ट्री
brett randell
| Updated on: Nov 12, 2026 | 10:06 AM

भारताविरुद्ध वनडे सीरीजच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी न्यूझीलंडने आपल्या टीममध्ये बदल केलाय. वेगवान गोलंदाज ब्रेट रँडेलला पहिल्यांदा राष्ट्रीय संघात स्थान मिळालय. त्या शिवाय ऑलराऊंडर जोश क्लार्कसनचं सुद्धा टीममध्ये पुनरागमन झालय. रँडलकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू करण्याची संधी आहे. 31 वर्षाच्या रँडलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगलं प्रदर्शन केलय. रँडल आतापर्यंत 46 फर्स्ट क्लास, 55 लिस्ट ए आणि 45 टी 20 सामने खेळला आहे. या दरम्यान त्याने 284 विकेट काढलेत. रँडलने या वर्षी फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये सलग पाच विकेट काढले होते. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा कुठल्या बॉलरने अशी कामगिरी केलीय. रँडलच्या टीममधील निवडीवर हेड कोच रॉब वॉल्टर यांनी आनंद व्यक्त केला आहे. “रँडल दीर्घकाळापासून चांगलं क्रिकेट खेळतोय. त्याला संधी मिळणं हा त्याचा हक्क आहे” असं कोच रॉब वॉल्टर म्हणाले.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि ब्लेयर टिकनर यांना दुखापत झाल्याने टीममध्ये बदल करावा लागलाय. अनेक प्रमुख खेळाडू भारताविरुद्ध होणाऱ्या दोन टेस्ट मॅच सीरीजच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. अशावेळी ब्रेट रँडल आणि जोश क्लार्कसन या दोघांना शेवटच्या दोन वनडे साठी निवडण्यात आलं आहे. “हवामान अनुकूल राहिल आणि टीम सीरीजचा सकारात्मक शेवट करण्यात यशस्वी ठरेल” असं कोट रॉब वाल्टर म्हणाले. भारत सध्या पाच वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे.

Loading...

चौथ्या वनडेसाठी न्यूजीलंडचा स्क्वॉड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन एलन, मायकल ब्रेसवेल, क्रिस्टियन क्लार्क, जेकब डफी, मॅथ्यू फिशर, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिच हे (विकेटकीपर), मॅट हेनरी, काइल जेमिसन, निक केली, ब्रेट रँडेल, टिम सीफर्ट आणि विल यंग.

पाचव्या वनडेसाठी न्यूजीलंडचा स्क्वॉड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन एलन, मायकल ब्रेसवेल, क्रिस्टियन क्लार्क, जोश क्लार्कसन, जेकब डफी, मॅथ्यू फिशर, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिच हे (विकेटकिपर), निक केली, ब्रेट रँडेल, टिम सीफर्ट, ब्लेयर टिकनर आणि विल यंग

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us