IND vs PAK: थरारक मॅच जिंकताच भारतीय पोरं मालामाल, तर पराभवानंतरही पाकवर झाला पैशांचा पाऊस, किती बक्षिस रक्कम मिळाली?

IND vs PAK U19 Mens Asia Cup Prize Money: भारत पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला भारतीय संघाने जिंकला. यानंतर मात्र दोन्ही संघ मालामाल झाले. भारतीय संघाला आणि पाकिस्तानच्या संघाला किती बक्षिस रक्कम मिळाली ते पाहा...

IND vs PAK: थरारक मॅच जिंकताच भारतीय पोरं मालामाल, तर पराभवानंतरही पाकवर झाला पैशांचा पाऊस, किती बक्षिस रक्कम मिळाली?
| Updated on: Nov 15, 2026 | 7:55 AM

U19 Mens Asia Cup IND vs PAK Final Match: ओमानमध्ये खेळल्या गेलेल्या एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कप २०२६ च्या रोमांचक अंतिम सामन्यात, भारतीय संघाने पाकिस्तानला १ गडी राखून पराभूत करून विक्रमी ९व्यांदा विजेतेपद पटकावले. शनिवारी खेळल्या गेलेल्या या ऐतिहासिक सामन्यात, भारतीय संघाने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला, ज्यानंतर चॅम्पियन बनल्याबद्दल भारतीय युवा संघाला लाखो रुपयांची बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली.

आशिया कप जिंकल्याबद्दल किती बक्षीस रक्कम मिळाली?

Loading...

बक्षीस रकमेच्या तपशिलानुसार, अंडर-१९ आशिया कप २०२६ चे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला १५,००० अमेरिकी डॉलर्स (US$15,000) म्हणजेच भारतीय चलनात १४ लाखांहून अधिक रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. दरम्यान, उपविजेत्या पाकिस्तान संघाला, अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत कडवी झुंज दिल्यानंतर, ७,५०० अमेरिकी डॉलर्स (US$7,500) म्हणजेच ७ लाखांहून अधिक रुपयांच्या बक्षीस रकमेवर समाधान मानावे लागले.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने उस्मान खान (१०७), अब्दुल कादिर (८०) आणि कर्णधार फरहान युसूफ (६३) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर ५० षटकांत ९ गडी गमावून ३३७ धावा केल्या. भारताकडून काव्य पटेलने ४ आणि चिगुरुपती व्यंकटने ३ बळी घेतले. ३३८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर आर्यवीर सेहवागने ५८ आणि कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानीने ८० धावा केल्या.

एका क्षणी, ९ गडी गमावल्यानंतर भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर होता, पण १० व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोहित उल्वाने सामन्याचे चित्र पालटले. मोहितने काल जो खेळ खेळला तो खरं तर अशक्य होता, म्हणजे कोणीच बोलू शकले नसते की भारत इथून जिंकूही शकतो. पण मोहितने २६ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावांची एक आकर्षक नाबाद खेळी केली. त्याने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारताला ३३९/९ पर्यंत पोहोचवले, ज्यामुळे एक ऐतिहासिक विजय आणि लाखो रुपयांची बक्षीस रक्कम निश्चित झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us