IND vs SA, 2nd ODI, LIVE Score: दक्षिण आफ्रिकेने दुसरी वनडे जिकंली

भारताने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

IND vs SA, 2nd ODI, LIVE Score: दक्षिण आफ्रिकेने दुसरी वनडे जिकंली
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 10:15 PM

पार्ल: सुमार गोलंदाजी आणि अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या धावा यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) भारताचा सात विकेट राखून पराभव केला. भारताने कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता शेवटची वनडे रविवारी होणार आहे. भारताने विजयासाठी दिलेले 288 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने अगदी आरामात पार केले.

सलामीवीर क्विंटन डि कॉक (78) आणि जानेमन मालान (91) यांनी पहिल्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी करुन विजयाची पायाभरणी केली. शार्दुल ठाकूरने डिकॉकला पायचीत करुन ही जोडी फोडली. भारताला दुसरा विकेट 212 धावांवर मिळाला.

भारत : केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिका: टेंबा बवुमा (कर्णधार), यानमन मलान, क्विंटवन डिकॉक (विकेटकिपर), एडन मार्करम, रेसी वान डर डुसें,डेविड मिलर, एंडिले फेहुलकवायो, सिसांदा मगाला, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी.