वुमन्स वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी; शफाली वर्मा आऊट

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या एका महिन्याचा अवधी शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी संघाची घोषणा केली असून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात संघ मैदानात उतरेल. चला जाणून घेऊयात 15 खेळाडूंबाबत

वुमन्स वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी; शफाली वर्मा आऊट
Image Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Aug 19, 2025 | 4:51 PM

वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. ही स्पर्धा 30 सप्टेंबरपासून सुरु होणार असून 8 संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व राहिलं आहे. तर न्यूझीलंडने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे यंदा जेतेपदाची चव चाखण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 1973 पासून सुरुवात झाली असून यंदा 13वं पर्व आहे. ऑस्ट्रेलियाने 7, इंग्लंडने 4 आणि न्यूझीलंडने जेतेपदावर एकदा नाव कोरलं आहे. त्यामुळे जेतेपदासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. नीतू डेविडच्या अध्यक्षतेकाली महिला निवड समितीने 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर संघाची धुरा असणार आहे. तर स्मृती मंधानाला उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. तर प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स या संघाचा भाग आहेत.

वुमन्स वर्ल्डकप संघातून शेफाली वर्माला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. शेफाली वर्माची कामगिरी गेल्या काही महिन्यात तशी काही खास नव्हती. त्यामुळे तिला या संघातून वगळण्यात आलं आहे. सध्या भारत अ संघासोबत ती ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. वनडे वर्ल्डकपसाठी निवडलेला संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रेणुका सिंह, अरुंधति रेड्डी, ऋचा घोष, क्रांति गौड़, अमनजोत कौर, राधा यादव, स्री चरणी, यास्तिका भाटिया, स्नेह राणा.

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 30 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. 5 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध, 9 ऑक्टोबरला दक्षिण अप्रिकेविरुद्ध, 12 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध, 19 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध, 23 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध आणि 26 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध सामना होणार आहे. भारत पाकिस्तान हा सामना हायब्रिड मॉडेलवर खेळला जाणार आहे. हा सामना तटस्थ ठिकाणी म्हणजेच कोलंबोत खेळला जाणार आहे. भारताचे इतर सामने बंगळुरु, इंदूर, गुवाहटी आणि विशाखापट्टणम येथे खेळला जाईल.