T20 World Cup :’भारताला पाकिस्तान आवडत नाही, म्हणून जाणूनबुजून झेल सोडले’, क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

| Updated on: Nov 01, 2022 | 11:14 AM

विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात सुरु झाल्यापासून क्रिकेटच्या चाहत्यांना दोन टीममधील संघर्ष पाहायला मिळत आहे.

T20 World Cup :भारताला पाकिस्तान आवडत नाही, म्हणून जाणूनबुजून झेल सोडले,  क्रिकेटपटूचा गंभीर आरोप
Team India
Image Credit source: BCCI
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तान टीमचा (Pakistan Team) महत्त्वाच्या मॅचमध्ये पराभव झाल्यापासून त्याचा सेमीफायनलमध्ये (Semifinale) पोहोचण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे चाहते टीम इंडियाला (Team India) दोष देत आहेत. टीम इंडिया मुद्दाम आफ्रिकेविरुद्ध (SA) हारल्याचा आरोप सोशल मीडियावर पाकिस्तानच्या चाहत्यांनी केला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूने ‘भारताला पाकिस्तान आवडत नाही, म्हणून जाणूनबुजून झेल सोडले’, असा गंभीर आरोप केला आहे.

विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात सुरु झाल्यापासून क्रिकेटच्या चाहत्यांना दोन टीममधील संघर्ष पाहायला मिळत आहे. सद्या ऑस्ट्रेलियात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे अनेकदा सामन्यादरम्यान व्यत्यय आला आहे.

टीम इंडियाने सुरुवातीच्या मॅचमध्ये पाकिस्तान टीमचा पराभव केला. दुसऱ्या मॅचमध्ये नेदरलॅंड टीमचा पराभव केला. टीम इंडियाकडे सद्या चार गुण आहेत. तसेच आतापर्यंत टीम इंडियातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाचा तीन मॅचमध्ये फक्त एक पराभव झाला आहे.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तान टीमचे माजी खेळाडू सलीम मलिक यांनी पाकिस्तानी चैनल 24 न्यूज एचडी या वाहिनीला एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीमध्ये “टीम इंडियाला पाकिस्तान आवडत नाही, पाकिस्तान टीम सेमीफायनलमध्ये नको असल्यामुळे टीम इंडिया आफ्रिकेविरुद्ध मुद्दाम हारली. विशेष म्हणजे टीम इंडियातील काही खेळाडूंनी महत्त्वाचे कॅच सोडले.” असा गंभीर आरोप केला आहे.