काश्मीर मुद्द्यावरुन गौतम गंभीरने शाहीद आफ्रिदीला झाडलं

| Updated on: Aug 29, 2019 | 12:11 PM

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार गौतम गंभीरने काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला चांगलचं झाडलं आहे.

काश्मीर मुद्द्यावरुन गौतम गंभीरने शाहीद आफ्रिदीला झाडलं
Follow us on

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार गौतम गंभीरने काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला चांगलचं झाडलं आहे. नुकतेच शाहीदने काश्मीर मुद्द्यावर एक वादग्रस्त वक्तव्य केलं होते. ज्यामुळे भारतीयांनी त्याच्यावर टीका केली होती.

काही दिवसांपूर्वी भारत सरकारने काश्मीरमधून कलम 370 हटवले होते. यानंतर आफ्रिदीने म्हटले होते की, मी काश्मिरी लोकांसोबत उभा आहे आणि यासाठी मी नियंत्रण रेषेचा दौरा करेल. आफ्रिदीच्या या वक्तव्यानंतर भारतीयांनी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आफ्रिदीला ट्रोल केले होते. तसेच भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही ट्विटरवरुन आफ्रिदीला सडेतोड उत्तर दिले आहे.

“मित्रांनो, या फोटोमध्ये शाहीद आफ्रिदी स्वत:ला विचारत आहे की, स्वत:ची स्वत:ला लाज वाटावी म्हणून काय करावे. जेणेकरुन सर्वांना समजेल की, मी अजूनही वयाने मोठा झालेलो नाही. त्याच्यासाठी मी ऑनलाईन किंडरगार्टेन ट्यूटोरिअल ऑर्डर करत आहे”, असं ट्वीट गौतम गंभीरने केलं आहे.

यााधी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी घोषणा केली होती की, काश्मिरी लोकांमध्ये एकजूट दिसावी म्हणून त्यांच्या राज्यात प्रत्येक आठवड्याला एक 30 मिनिटाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल.

यावर आफ्रिदीने ट्वीट करत म्हटले, “पंतप्रधानद्वारे काश्मिरी लोकांच्या समर्थनासाठी सुरु केलेल्या कार्यक्रमाला माझे समर्थन आहे. मी शुक्रवारी दुपारी 12 वाजता यासाठी मजार-ए-काएद (मोहम्मद अली जिन्ना यांची मजार) वर उपस्थित राहील”.

“काश्मिरी लोकांच्या समर्थनासाठी माझ्या सोबत जोडा. 6 सप्टेंबरला मी शहीदांच्या घरी भेट देईल आणि तिथूनच नियंत्रण रेषेवर जाईल”, असं आफ्रिदी म्हणाला.

याआधीही आफ्रिदीने काश्मीरवरील कलम 370 हटवल्यामुळे संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती.  माजी पाकिस्तानी क्रिकेट कर्णधार जावेद मियांदादही म्हटले आहेत की, मी नियंत्रण रेषेचा दौरा करणार आहे. तसेच मुळचा पाकिस्तानी ब्रिटीश बॉक्सर आमिर खानने 27 ऑगस्ट रोजी नियंत्रण रेषेचा दौरा केला.