IND vs BAN Preview: टीम इंडियाची आज पहिली परीक्षा, बांग्लादेशचे हालही इंग्लंडसारखेच होणार ?

2023 च्या वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडिया ज्या आक्रमक पद्धतीने खेळली होती तोच फॉर्म नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही पाहायला मिळाला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही टीम इंडियाने तसाच खेळ केल्यास जेतेपद नक्कीच पटकावता येईल.

IND vs BAN Preview: टीम इंडियाची आज पहिली परीक्षा, बांग्लादेशचे हालही इंग्लंडसारखेच होणार ?
इंडिया वि.बांग्लादेश
| Updated on: Feb 20, 2025 | 8:01 AM

पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरूवात झाली कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यानंतर आता नजर दुबईकडे वळली आहे, जिथे भारतीय क्रिकेट संघ आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर आज, अर्थात 20 फेब्रुवारी रोजी, ग्रुप स्टेजमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशशी होणार आहे. बांगलादेशचाही हा पहिलाच सामना असेल. या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला विजयाचा दावेदार मानला जात आहे, मात्र टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी देते? याची अनेकांना उत्सुकता आहे. दुबईची खेळपट्टी कशी असेल याकडेही प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत, कारण येथे अद्याप एकही सामना झालेला नाही आणि फक्त टीम इंडियाच येथे आपले सामने खेळणार आहे.

वर्ल्डकप सारखाच आहे भारताचा फॉर्म

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेतील दुसरा सामना गुरुवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सध्याच्या फॉरमॅटमुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे आणि एक पराभवही संघाला स्पर्धेतून बाहेर पाठवू शकतो. अशा स्थितीत टीम इंडिया दमदार विजयाने सुरुवात करेल, अशी आशा प्रत्येकालाच आहे. मात्र या सामन्याकडे 23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मोठ्या सामन्याची पूर्वतयारी म्हणून पाहता येईल. रविवारी याच मैदानावर टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानी टीमला न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव पत्करावा लागला होता.

दरम्यान, भारतीय संघ या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेतील दारुण पराभवातून सावरल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दमदार पुनरागमन करत त्यांचा क्लीन स्वीप केला. या मालिकेत टीम इंडिया अगदी त्याच स्टाइलमध्ये क्रिकेट खेळताना दिसली, जसा 2023 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये त्यांचा फॉर्म होता. रोहितच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा संघाला तोच फॉर्म कायम ठेवत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही चमत्कार घडवायचा आहे.

हवामानामुळे रसभंग नको

मात्र, या सामन्यात दुबईच्या हवामानाकडेही लक्ष असेल. दुबईत मंगळवारी पाऊस झाला आणि गुरुवारीही पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे चाहत्यांचा रसभंग होऊ शकतो.. असं झालं तर टीम इंडिया ही पेस अटॅकवर बर देील की स्पिन हेवी बॉलिंग अटॅक निवडेल हे पाहणं महत्वाचं ठरेल. अशा परिस्थितीत मोहम्मद शमीसह दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्यात स्पर्धा असेल. फिरकीपटूंचा विचार केला तर पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यासह अक्षर पटेलला स्थान मिळण्याची खात्री आहे.

पराभवानंतर बांग्लादेश करेल पुनरागमन ?

बांगलादेशच्या बाबतीत बोलायचं झालं तर अलिकडच्या काही महिन्यांत देशात अशांतता दिसून आली, त्याचप्रमाणे बांगलादेशी क्रिकेट संघाचीही स्थिती आहे. शाकिब अल हसनची गोलंदाजी अवैध असल्याचे समोर आल्यानंतर त्याला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले. तर तमीम इक्बालला संघात परत आणण्यासाठी मन वळवण्याचे प्रयत्नही अयशस्वी ठरले. या सगळ्यात संघाची कामगिरीही तशीच राहिली. बांगलादेशने डिसेंबर 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटची एकदिवसीय मालिका खेळली होती परंतु त्यांना 0-3 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. आता या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संघाचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोप्रयत्न करताना दिसेल.