सूर्य तळपला ! इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक

| Updated on: Mar 18, 2021 | 8:18 PM

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t2oi) सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 28 चेंडूत पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं आहे.

सूर्य तळपला ! इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t2oi) सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 28 चेंडूत पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं आहे.
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमध्ये चौथा टी 20 सामना (India vs England 2021 4th T20) खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मुंबईकर सूर्यकुमार यादवने शानदार (Suryakumar Yadav) कामगिरी केली आहे. सूर्याने आपल्या बॅटिंग करतानाच्या पहिल्या सामन्यात अफलातून अर्धशतक झळकावंल आहे. सूर्याने अवघ्या 28 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह अर्धशतक लगावलं आहे. सूर्याच्या टी 20 कारकिर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं आहे. सूर्याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून दार्पण केलं होतं. पण त्याला त्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे सूर्यकुमार आपल्या कारकिर्दीती दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना अर्धशतक लगावणारा तिसरा भारतीय ठरला. (india vs england 4th t2oi suryakumar yadav makes his maiden fifty)

दुसऱ्या सामन्यात अर्धशतक करणारे भारतीय

याआधी रोहित शर्मा आणि रॉबिन उथप्पा यांनी पहिल्यांदा बॅटिंग करताना अर्धशतक झळकावलं होतं. त्यांनी ही कामगिरी आपल्या दुसऱ्या सामन्यात केली होती. त्यांना त्यांच्या पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. रोहितने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 50 धावा केल्या होत्या. तर उथप्पाने 2007 मध्येच पाकिस्तान विरुद्ध 50 धावंची खेळी साकारली होती.

शानदार सुरुवात

सूर्याला या सामन्यात इशान किशनच्या जागी संधी देण्याती आली. सूर्याने या संधीचं सोनं केलं. बॅटिंगसाठी आलेल्या सूर्याने आपल्या टी 20 कारकिर्दीतील बॅटिंगची झोकात सुरुवात केली. सूर्याने पहिल्याच चेंडूवर सिक्स खेचत अफलातून सुरुवात केली.

इशान किशनचे पदार्पणात अर्धशतक

दरम्यान इशान किशन आणि सूर्यकुमार यादवने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 मधून पदार्पण केलं. या पदार्पणातील सामन्यात इशानने शानदार खेळी केली. त्याने 56 धावांची खेळी केली होती. यासह इशान पदार्पणातील सामन्यात टी 20 मध्ये अर्धशतक लगावणारा दुसरा भारतीय ठरला. याआधी अजिंक्य रहाणेने ही कामगिरी केली होती. अजिंक्यने आपल्या टी 20 डेब्युमध्ये 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध 61 रन्सची खेळी केली होती.

संबंधित बातम्या :

India vs England 4TH T20 | इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यात ‘हिटॅमन’ रोहित शर्माला मोठा विक्रम करण्याची संधी

PHOTO | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, 3 फलंदाजांना किर्तीमान करण्याची संधी

(india vs england 4th t2oi suryakumar yadav makes his maiden fifty)