
आशिया कप 2025 धडाक्यात सुरूवात झाली असून आज दुबईतील स्टेडियममध्ये भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे. मात्र, हा सामना सुरू होण्याच्या काही तास अगोदरच मोठ्या वादाला तोंड फुटलंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. फक्त हेच नाही तर आज या निर्णयाविरोधात जोरदार निर्देशन होताना दिसत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले. हेच नाही तर स्थिती युद्धापर्यंत जाऊन पोहोचली होती. पहलगाम हल्ल्यात अनेक निर्दाेष लोकांचा जीव गेल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले. हेच नाही तर या भारतीय क्रिकेटर्सचा देखील या सामन्याला विरोध असल्याचा दावा केला जात आहे.
आता या सामन्याच्या काही तास अगोदरच एक धक्कादायक अशी बातमी पुढे येताना दिसतंय. एका इंग्रजी दैनिकात धक्कादायक रिपोर्ट भारत आणि पाकिस्तान सामन्याचा देण्यात आलाय. रिपोर्टनुसार, भारताच्या ड्रेसिंगरूममध्ये या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे वारे वाहत आहे. आता हा मोठा धक्का असणार आहे. मुख्य प्रशिक्षक गाैतम गंभीर यांनी खेळाडू आणि इतर स्टॉपसोबत चर्चा केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकात आलंय.
यासोबतच भारतीय संघातील खेळाडूंना व्यावसायिक राहण्यास सांगण्यात आलंय. इतर सामन्याप्रमाणेच हा सामना खेळण्यास सांगितले असल्याची माहिती मिळतंय. भारत पाकिस्तान सामना खेळवला जाईल असे वाटले नव्हते असं रायन टेन यांनी म्हटले. भारत पाकिस्तान सामन्याच्या अगोदर भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या रायन टेन यांनी ही प्रतिक्रिया दिली. भारत पाकिस्तान सामना सुरू होण्याच्या अगोदर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
हेच नाही तर भारताच्या ड्रेसिंगरूममध्ये थेट बहिष्काराचे वातावरण असताना गंभीर यांनी सर्व खेळाडूंशी चर्चा केली. आता खेळाडू सामन्यावर बहिष्कार टाकणार की, मैदानात पाकिस्तानला धूळ चारणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दरवेळीच्या तुलनेत भारत पाकिस्तान सामन्याची तिकिटेही म्हणावी तशी विकली गेली नसल्याने रिपोर्टमध्ये स्पष्ट झालंय. भारतीय प्रेक्षक हे मोठ्या संख्येने या सामन्याला विरोध करताना दिसत आहेत.