पाकिस्तानी फॅन्सकडून भारतीय महिला क्रिकेटरबद्दल लाजिरवाणं विधान, जे म्हणालं ते ऐकून तुम्हालाही यैईल प्रचंड राग, Video Viral

IND vs PAK Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल सामना पार पडला जो भारतीय संघाने जिंकला. पराभवामुळे पाकिस्तानी चाहत्यांचा संयम सुटला आणि त्यांनी भारतीय महिला क्रिकेटपटूबद्दल नको ते विधान केले.

पाकिस्तानी फॅन्सकडून भारतीय महिला क्रिकेटरबद्दल लाजिरवाणं विधान, जे म्हणालं ते ऐकून तुम्हालाही यैईल प्रचंड राग, Video Viral
| Updated on: Sep 06, 2026 | 2:24 PM

२०२६ च्या महिला टी-२० आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला.  या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला.  इतकेच नव्हे तर, भारताने त्यांना त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात कमी टी-२० आंतरराष्ट्रीय धावसंख्येवर सर्वबाद केले. पाकिस्तानी क्रिकेटर आणि चाहत्यांना नेहमीच पराभव पचवणे कठीण जाते. पराभव पाकिस्तानला जिव्हारी लागतो आणि मग त्यानंतर ते अतिशय खालच्या थराला जातात हे काय नवीन नाही, असाच प्रकार त्यांनी कालच्या सामन्यात पुन्हा केल्याचा प्रकार घडला आहे.

भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

आपल्या संघाला एकामागून एक विकेट गमावताना आणि पराभवाला सामोरे जाताना पाहून, स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या काही पाकिस्तानी चाहत्यांना स्वतःवर नियंत्रण सुटला. त्यांना पराभव डोळ्यादेखत दिसत होता म्हणून त्यांनी घृणास्पद कृत्य केले, त्यांनी बाउंड्रीवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारतीय खेळाडू क्रांती गौडला ‘मुलगा’ असे संबोधून टारगेट करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांचा संघ जिंकू शकत नाही, ते भारताला हरवू शकत नाहीत, तेव्हा त्यांनी अशी लाजिरवाणी टीका करायला सुरुवात केली. ते महिला क्रिकेटपटूला तु मुलगा असल्याचा आरोप केला.

मात्र, पाकिस्तानी चाहते इतके काहीही बोलले तरी, क्रांती गौडने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, आणि हेच एका खेळाडूचे लक्षण आहे. खेळणे आणि जिंकणे हे खेळाडूचे काम आहे. क्रांती गौडने ते मोठ्या दिमाखात करून दाखवले. ती आपल्या संघाच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली आणि पाकिस्तानला कडवी झुंज दिली,  परिणाम भारतीय संघाने सामना जिंकला. पण आता या वरुन पाकिस्तानी चाहत्यांची मात्र सर्वत्र नाचक्की होत आहे.

 

एका महिला क्रिकेटपटूला थेट मैदानात सर्वांसमोर अशा पद्धतीने बोलणं ही लाजिरवाणी बाब आहे, जी पाकिस्तानी चाहत्यांनी केली आहे. क्रांती गौडने यावेळी दाखवलेल्या तिच्या संयमाचे आता कौतुक होत आहे. आता पाकिस्तानी चाहत्यांच्या कृत्यावर काही कठोर कारवाई केली जाते का याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us