IND vs SA: DRS वरुन आजही ड्रामा, विराट कोहली पुन्हा चिडला

केपटाऊन: न्यूलँडसच्या मैदानावर DRS सिस्टिमवरुन आज पुन्हा एकदा ड्रामा पाहायला मिळाला. डीआरएस रिव्ह्यू रॅसी वॅन डेर डुसेच्या बाजूने गेल्याने विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा चिडल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्याडावातील 37 व्या षटकात ही घटना घडली. चालू कसोटी सामन्यात कोहलीने दुसऱ्यांदा आपला संयम गमावला. कालही तिसऱ्यादिवशी डीआरएसवरुन कोहली, अश्विन आणि राहुलने मैदानात राडा घातला होता. 37 […]

IND vs SA:  DRS वरुन आजही ड्रामा, विराट कोहली पुन्हा चिडला
Virat Kohli
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 4:04 PM

केपटाऊन: न्यूलँडसच्या मैदानावर DRS सिस्टिमवरुन आज पुन्हा एकदा ड्रामा पाहायला मिळाला. डीआरएस रिव्ह्यू रॅसी वॅन डेर डुसेच्या बाजूने गेल्याने विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा चिडल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्याडावातील 37 व्या षटकात ही घटना घडली. चालू कसोटी सामन्यात कोहलीने दुसऱ्यांदा आपला संयम गमावला. कालही तिसऱ्यादिवशी डीआरएसवरुन कोहली, अश्विन आणि राहुलने मैदानात राडा घातला होता.

37 व्या षटकात काय घडलं?

मोहम्मद शमी 37 वे षटक टाकत होता. समोर डुसे होता. शमीच्या एका चेंडूवर डुसे चकला व चेंडू विकेटकिपर ऋषभ पंतकडे गेला. त्यावर भारतीय संघाने जोरदार अपील केलं. पंचांनी अपील अमान्य केलं. त्यानंतर कोहलीने रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये चेंडू बॅटच्या जवळून जाताना स्निकोमीटरमध्ये कट लागल्याचं दिसत होतं. पण त्याचवेळी डुसेंची बॅटही जमिनीवर आपटली होती. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी इरास्मस यांचा नाबादचा निर्णय कायम ठेवला. त्यावर विराट मैदानावरील पंच इरास्मस यांच्याशी काही बोलला आणि त्यानतंर रॅसी डुसे बरोबरी शाब्दीक वाद झाला.

काल मैदानात काय घडलं होतं?
तिसऱ्यादिवसाच्या अखेरच्या सत्रात डीन एल्गर आणि कीगन पीटरसनची जोडली जमली होती. ते संघाला विजयी लक्ष्याच्या दिशेने नेत होते. त्याचवेळी अश्विनच्या एका चेंडूवर एल्गरला फसला. भारतीय संघाने पायचीतचे अपील करताच मैदानावरील पंच माराईस इरास्मस यांनी एल्गरला आऊट दिले.

एल्गरने रिव्ह्युचा निर्णय घेतला. पण मैदानावरील पंचांचा निर्णय बदलला जाईल, असे त्याला वाटत नव्हते. रिप्ले पाहिल्यानंतर एल्गर ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला होता. बॉल ट्रॅकिंग टेक्नोलॉजीने चेंडू स्टंम्पसवरुन जातोय, असं दाखवलं.

आर. अश्विन, विराट कोहली आणि केएल राहुलला बॉल ट्रॅकिंग टेक्नोलॉजीवर विश्वास बसला नाही. तिसऱ्या पंचांनी एल्गरला नाबाद ठरवलं. त्यानंतर या तिघांनी स्टंम्पजवळ जाऊन आपला संताप व्यक्त केला. जेणेकरुन सर्वांना समजेल. खरंतर हे टाळता आलं असतं.