IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडे सामन्यात धोनीच्या लाडक्याला संधी मिळाली, कोणाला डच्चू?

IND vs WI 3rd ODI Match: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात एका गोलंदाजाला पदार्पण मिळाले आहे.

| Updated on: Oct 03, 2026 | 3:08 PM
1 / 5
हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पदार्पणाची संधी देण्यात आली. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कंबोजला हे बक्षीस मिळाले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा जखमी झाला त्यामुळे त्याला पदार्पणाची संधी देण्यात आली.

हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पदार्पणाची संधी देण्यात आली. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कंबोजला हे बक्षीस मिळाले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा जखमी झाला त्यामुळे त्याला पदार्पणाची संधी देण्यात आली.

2 / 5

अंशुल कंबोजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक गोलंदाज म्हणून आणि खालच्या फळीत चांगली फलंदाजी करून आपले कौशल्य दाखवून दिले आहे. त्याने ३५ लिस्ट ए सामन्यांमध्ये ५६ बळी घेतले आहेत. प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ११६ बळी आहेत. त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७६ बळी घेतले आहेत. त्याने गेल्या वर्षी मँचेस्टरमध्ये कसोटी पदार्पणही केले होते.

3 / 5

अंशुल कंबोजला एकेकाळी क्रिकेट सोडायचे होते. दुखापतीमुळे तो १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळू शकला नाही. २०२० च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेपूर्वी त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले होते, ज्यामुळे तो खूप निराश झाला होता आणि त्याने क्रिकेट सोडण्याचा विचार केला होता. पण त्याचे वडील आणि प्रशिक्षक, सतीश राणा यांनी त्याला पुढे जाण्यासाठी समजावले

4 / 5

अंशुल हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जमधून खेळतो, चेन्नईने अंशुलला संघात म्हणूनच सामील करण्याचे कारणच धोनी होते. देशांतगर्तमधील कामगिरीने धोनीला प्रभावित केल्यामुळे अंशुलला चेन्नईमध्ये सामील केले गेले होते.

5 / 5

अखेर एवढ्या मेहनतीचे आता फळ त्याला मिळाले. आधी कसोटी आणि आता वनडेमध्ये त्याला संधी मिळाली. प्रसिद्ध कृष्णाला दुखापत झाल्याने सिराजला संधी मिळाली, तर आकिब नबी आणि जडेजाला डच्चू देण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us