
भारतीय क्रिकेट संघाने पाठीमागच्या काही वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. ऑस्ट्रेलियाला दोन वेळा कसोटी मालिकेत नमवून भारताने पाठीमागच्या चार वर्षांपासून आयसीसीच्या टॉप टेन रँकिंगमध्ये स्थान प्रथम स्थान टिकवलंय. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही जागा मिळवली आहे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आकडेवारी सहित याची ग्वाही देतो. 2015 पासून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ क्रिकेट जगतातील सगळ्यात अव्वल संघ आहे. 2015 पासून भारताने 64 सामन्यांपैकी 40 सामन्यात विजयाचा झेंडा फडकवलाय. तर 11 मॅच ड्रॉ आणि 13 मॅच मध्ये विराट सेनेला पराभव स्वीकारावा लागला.

सर्वाधिक कसोटी विजयाच्या लिस्टमध्ये जो रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ दुसऱ्या स्थानावर आहे. रूटने चार वर्षांपूर्वी इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा हातात घेतली होती. 2015 पासून इंग्लंडने सर्वाधिक 82 मॅचेस खेळलेत. यापैकी 38 सामन्यात त्यांना विजय मिळाला तर 33 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. याशिवाय 13 सामने ड्रॉ करण्यात त्यांना यश आलं.

तिसऱ्या नंबरवर ऑस्ट्रेलियाची टीम आहे. आधी स्टीव स्मिथ आणि आता टीम पेन यांच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघानं 62 कसोटी सामन्यांपैकी 32 सामन्यात विजय मिळवलाय. तर 21 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 9 मॅच ड्रॉ करण्यात कांगारुंना यश आलं.

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे. पाठीमागच्या दोन-तीन वर्षांपासून न्यूझीलंडचा संघ चांगलं प्रदर्शन करतोय. आता न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला टक्कर देणार आहे. 2015 पासून न्यूझीलंड संघाने 48 सामन्यांपैकी 26 सामन्यात विजय मिळवला तर 15 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय सात सामने ड्रॉ करण्यात किवी खेळाडूंना यश आलं.

team india