ISL 2020 | एटीके मोहन बागान जमेशदपूर एफसीविरोधात विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी सज्ज

| Updated on: Dec 07, 2020 | 7:08 PM

एटीके मोहन बागान विजयी घोडदौड कायम राखणार की जमेशदपूर एफसी पहिला विजय मिळवणार?

ISL 2020 | एटीके मोहन बागान जमेशदपूर एफसीविरोधात विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी सज्ज
Follow us on

गोवा : इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या (Indian Super League)सातव्या पर्वात आज (7 डिसेंबर) जमशेदपूर (Jamshedpur FC) विरुद्ध एटीके मोहन बागान फुटबॉल क्लब (ATK Mohun Bagan) यांच्यात सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना गोव्यातील टिळक मैदानात (Tilak Maidan) खेळण्यात येणार आहे. या सामन्यातही विजयी घौडदौड कायम ठेवण्याचा मानस एटीकेचा असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला जमशेदपूर संघाचा पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. Indian Super League 2020 today match Jamshedpur FC vs ATK Mohun Bagan 7 december 2020

जमशेदपूरने आतापर्यंत या मोसमात एकूण 3 सामने खेळले आहेत. मात्र अजूनही जमेशदपूरला विजय मिळवता आला नाहीये. जमेशदपूरने 2 सामने अनिर्णित राखले. तर एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. तर एटीकेने खेळलेल्या तिनही सान्यात विजय मिळवला आहे.

एटीकेचा मजबूत अटॅक आणि डिफेंस

“एटीकेने आतापर्यंत अॅटेक आणि डिफेन्सद्वारे शानदार कामगिरी केली आहे. या मोसमात या संघाने अद्याप विरोधी संघाला एकही गोल करुन दिला नाही. तर एटीकेने 4 गोल लगावले आहेत. अॅटेकमुळे आम्हाला चांगली सुरुवात मिळाली आहे. तर डिफेंसमुळे आम्ही महत्वपूर्ण तसंच निर्णायक भूमिका बजावली आहे. स्पर्धेच्या पहिल्या 3 सामन्यात आमच्याविरोधात कोणालाच गोल करता आला नाही, ही आमच्यासाठी महत्वपूर्ण बाब आहे. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आहे. तसेच चांगली कामगिरी करतेय”, अशी प्रतिक्रिया एटीकेएमबीचे प्रशिक्षक एंटोनिया हबास यांनी दिला.

जमेशदपूर एफसी पुनरागमनासाठी सज्ज

“आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्याविरोधात विजय मिळवण्यासाठी सक्षम आहोत. प्रत्येक सामना म्हणजेच एक आव्हानच आहे. साखळी फेरीतील प्रत्येक सामना थरारक आणि रंगतदार राहिला. एटीके माोहन बागानने गुणांच्या बाबतीत चांगल्या सुरुवात केली अन निकालही चांगले आले. त्यामुळे आमचं लक्ष या सामन्यावर आहे”, अशी प्रतिक्रिया जमशेदपूरचे कोच ओवेन कॉयल यांनी दिली.

मुंबई सिटी अव्वल क्रमांकावर

मुंबई सिटी गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई सिटीने आतापर्यंत या मोसमात एकूण 4 सामने खेळेल आहेत. यापैकी 3 सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. तर 1 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईकडे एकूण 9 पॉइंट्स आहेत.

संबंधित बातम्या :

Formula 2 Race | जेहान दारुवालाची ऐतिहासिक कामगिरी, फॉर्म्युला 2 रेस जिंकणारा पहिला भारतीय

Indian Super League 2020 today match Jamshedpur FC vs ATK Mohun Bagan 7 december 2020