IPL 2019 schedule : आयपीएल वेळापत्रक, धोनी विरुद्ध कोहलीची पहिली लढत!

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL) 2019 चं पहिल्या दोन आठवड्याचं वेळापत्रक जाहीर झालं. पहिला सामना 23 मार्चला गतविजेती धोनीची चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. चेन्नईतील एम चिदंबरम मैदानावर आयपीएलच्या नव्या मोसमाचं रणशिंग फुंकलं जाईल. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आयपीएलच्या वेळापत्रकात बदलही केला जाऊ […]

IPL 2019 schedule : आयपीएल वेळापत्रक, धोनी विरुद्ध कोहलीची पहिली लढत!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL) 2019 चं पहिल्या दोन आठवड्याचं वेळापत्रक जाहीर झालं. पहिला सामना 23 मार्चला गतविजेती धोनीची चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. चेन्नईतील एम चिदंबरम मैदानावर आयपीएलच्या नव्या मोसमाचं रणशिंग फुंकलं जाईल. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आयपीएलच्या वेळापत्रकात बदलही केला जाऊ शकतो.

याबाबत बीसीसीआयने सांगितलं की, “निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्याचं वेळापत्रक निश्चित केलं जाईल. शिवाय त्यानंतरच शेड्यूलही त्यावेळीच ठरवलं जाईल”

सध्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 23 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत 17 सामने खेळवले जातील. 24,30 आणि 31 मार्चला दोन दोन सामने खेळवण्यात येतील. यादरम्यान दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स संघ 5-5 सामने खेळतील. अन्य 6 संघ यादरम्यान 4-4 सामने खेळतील.

आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक

मार्च 23: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (चेन्नई)

मार्च 24: कोलकाता नाईट राइडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद (कोलकाता)

मार्च 24: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स  (मुंबई)

मार्च 25: राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब, (जयपूर)

मार्च 26: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, (दिल्ली)

मार्च 27: कोलकाता नाईट राइडर्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब, (कोलकाता)

मार्च 28: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स, (बंगळुरु)

मार्च 29: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, (हैद्राबाद)

मार्च 30: किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, (मोहाली)

मार्च 30: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स, (दिल्ली)

मार्च 31: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स (हैद्राबाद)

मार्च 31: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, (चेन्नई)

एप्रिल 1: किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (मोहाली)

एप्रिल 2: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, (जयपूर)

एप्रिल 3: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, (मुंबई)

एप्रिल 4: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद, (दिल्ली)

एप्रिल 5: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स, (बंगळुरु)