IPL 2020 | ‘दुखापतग्रस्त’ दिल्लीला दिलासा, अमित मिश्राच्या जागी नव्या फिरकीपटूला संधी

| Updated on: Oct 19, 2020 | 5:44 PM

दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये 14 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

IPL 2020 | दुखापतग्रस्त दिल्लीला दिलासा, अमित मिश्राच्या जागी नव्या फिरकीपटूला संधी
Follow us on

दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा पहिला टप्पा पार पडला आहे. या पहिल्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) अनेक दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंना दुखापत झाली. त्यामुळे दिल्लीचा संघ अडचणीत सापडला होता. मात्र अशा परिस्थिती दिल्लीसाठी दिलासादायक बातमी आली आहे. दुखापतग्रस्त फिरकीपटू अमित मिश्राच्या जागी प्रवीण दुबेला (Pravin Dubey) दिल्ली संघात स्थान देण्यात आलं आहे. याबाबतची माहिती दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राच्या बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतमीमुळे मिश्राला आयपीएलमधून माघार घ्यावी लागली होती. IPL 2020 Delhi capitals Leg Spinner Pravin Dubey replaces Amit Mishra

कोण आहे प्रवीण दुबे?

प्रवीण दुबे हा लेग स्पीनर आहे. प्रवीण हा कर्नाटक संघाचं प्रतिनिधित्व करतो. या 27 वर्षीय प्रवीणने कर्नाटककडून 14 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 6.87 च्या इकॉनॉमी रेटने 16 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2016 आणि 2017 मध्ये प्रवीणचा आपल्या गोटात समावेश केला होता. मात्र त्याला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. प्रवीणला आता दिल्लीच्या संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे प्रवीण कशाप्रकारे कामगिरी करतो, याकडे दिल्लीच्या समर्थकांच लक्ष असणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 3 ऑक्टोबरला सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात अमित मिश्राने स्वत:च्या बोलिंगवर कॅच घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मिश्राच्या उजव्या बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे अमितला आयपीएल स्पर्धेला मुकावे लागले.

दिल्लीला दुखापतीचं ग्रहण

यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीपासूनच दिल्लीच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागंल आहे. पहिल्या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन आश्विनच्या खांद्याला दुखापत झाली होती. तसेच फिरकीपटू अमित मिश्रा आणि वेगवान बोलर इशांत शर्मा या दोघांना दुखापतीमुळे यंदाच्या मोसमातून बाहेर पडावे लागले आहे. तसेच आक्रमक फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतलाही दुखापतीमुळे आणखी काही सामन्यांना मुकावे लागणार आहे.

दिल्लीची दमदार कामगिरी

दिल्लीने यंदाच्या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. या 9 सामन्यांपैकी दिल्लीने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. यासह दिल्ली 14 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर शिखर धवन हे फलंदाज सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे दिल्लीला आयपीएल विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजले जात आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | बंगळुरु विरुद्धच्या सामन्याआधी दिल्लीला मोठा फटका, ‘हा’ अनुभवी खेळाडू स्पर्धेबाहेर

IPL 2020 | मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीला दुहेरी झटका, ‘हा’ आक्रमक खेळाडू दुखापतीमुळे सामन्यांना मुकणार

IPL 2020 Delhi capitals Leg Spinner Pravin Dubey replaces Amit Mishra