IPL 2020, KXIP vs DC : शिखर धवनची शतकी खेळी व्यर्थ, पंजाबची दिल्लीवर 5 विकेट्सने मात

| Updated on: Oct 20, 2020 | 11:46 PM

किंग्जस इलेव्हन पंजाबने या विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

IPL 2020, KXIP vs DC : शिखर धवनची शतकी खेळी व्यर्थ, पंजाबची दिल्लीवर 5 विकेट्सने मात
Follow us on

दुबई : किंग्जस इलेव्हन पंजाबने (Kings Eleven Punjab) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने मात केली आहे. दिल्लीने पंजाबला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान पंजाबने 5 विकेट्स गमावून 1 ओव्हरआधीच पूर्ण केले. पंजाबने एकूण 167 धावा केल्या. पंजाबच्या विजयामुळे गब्बर शिखर धवनची शतकी खेळी व्यर्थ ठरली. पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने महत्वपूर्ण 32 धावा केल्या. तसेच युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलनेही झटपट 29 धावांची छोटेखानी पण उपयोगी खेळी केली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. रवीचंद्रन आश्विन आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. दिल्लीच्या गब्बर शिखर धवनने सलग दुसऱ्यादा जब्बर शतकी खेळी केली. धवनने 57 चेंडूत धमाकेदार शतक केले. धवन शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने नाबाद 106 धावा केल्या. या खेळीत त्याने 12 फोर आणि 3 सिक्स लगावले.

दिल्लीकडून धवन व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. सलामीवीर पृथ्वी शॉ 7 धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि विकेटकीपर ऋषभ पंतने प्रत्येकी 14 रन केल्या. मार्कस स्टोयनिसने 9 तर शिमरॉन हेटमायरने 10 धावांची खेळी केली. पंजाबकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर ग्लेन मॅक्सवेल, जेम्स निशाम आणि मुर्गन आश्विन या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

[svt-event title=”पंजाबची दिल्लीवर 5 विकेटने मात” date=”20/10/2020,11:04PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबचा अर्धा संघ तंबूत” date=”20/10/2020,10:46PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाब 13 ओव्हरनंतर” date=”20/10/2020,10:32PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबला चौथा धक्का” date=”20/10/2020,10:30PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”निकोलस पूरनचे अर्धशतक” date=”20/10/2020,10:28PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाब 9 ओव्हरनंतर” date=”20/10/2020,10:10PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाब पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर” date=”20/10/2020,10:07PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबची तिसरी विकेट” date=”20/10/2020,10:06PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबची दुसरी विकेट” date=”20/10/2020,10:05PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबला पहिला धक्का” date=”20/10/2020,9:35PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात” date=”20/10/2020,9:23PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”धवनची नाबाद शतकी खेळी” date=”20/10/2020,9:10PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शिखर धवनचे सलग दुसरे शतक” date=”20/10/2020,9:03PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीला चौथा धक्का” date=”20/10/2020,8:55PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्ली 17 ओव्हरनंतर” date=”20/10/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्ली 16 ओव्हरनंतर” date=”20/10/2020,8:47PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्ली 15 ओव्हरनंतर” date=”20/10/2020,8:43PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीला तिसरा झटका” date=”20/10/2020,8:36PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शिखर धवनच्या आयपीएलमधील 5 हजार धावा पूर्ण” date=”20/10/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्ली 10 ओव्हरनंतर” date=”20/10/2020,8:21PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीला दुसरा धक्का” date=”20/10/2020,8:17PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शिखर धवनचे अर्धशतक” date=”20/10/2020,8:16PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”7 ओव्हरनंतर दिल्ली” date=”20/10/2020,8:08PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरनंतर दिल्ली” date=”20/10/2020,8:00PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीला पहिला धक्का” date=”20/10/2020,7:47PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्ली 2 ओव्हरनंतर” date=”20/10/2020,7:40PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात” date=”20/10/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असे आहेत दोन्ही संघ ” date=”20/10/2020,7:30PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्ली प्लेइंग इलेव्हन ” date=”20/10/2020,7:29PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”किंग्जस इलेव्हन पंजाबचा अंतिम 11 संघ” date=”20/10/2020,7:28PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीने टॉस जिंकला ” date=”20/10/2020,7:27PM” class=”svt-cd-green” ]

हेड 2 हेड

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत दिल्ली आणि पंजाब हे संघ एकूण 25 वेळा आमनेसामने भिडले आहेत. पंजाबने 25 सामन्यांपैकी 14 सामन्यात दिल्लीला पराभवाची धूळ चारली आहे. तर दिल्लीने पंजाबचा 11 सामन्यात पराभव केला आहे. यंदाच्या मोसमातील दिल्ली विरुद्ध पंजाब यांच्यात झालेला सामना बरोबरीत सुटला होता. दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये पंजाबवर मात केली होती. हा सामना 20 सप्टेंबरला खेळण्यात आला होता.

दिल्लीने आतापर्यंत यंदाच्या मोसमात एकूण 9 सामने खेळले आहेत. या 9 पैकी 7 सामन्यात दिल्लीचा विजय झाला आहे. दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये 14 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर पंजाबने खेळलेल्या एकूण 9 पैकी 3 सामन्यात विजय झाला आहे. पंजाब पॉइंट्सटेबलमध्ये 6 गुणांसह 7व्या क्रमांकावर आहे.

दोन्ही संघाचे फलंदाज फॉर्मात

दिल्ली आणि पंजाब या दोन्ही संघाचे फलंदाज दमदार कामगिरी करत आहे. पंजाबचे सलामीवीर मयंक अग्रवाल आणि कर्णधार लोकेश राहुल मोसमाच्या सुरुवातीपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. तर ख्रिस गेलनेही आपली चमक दाखवून दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीकडून शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरही धमाकेदार खेळी करत आहे. त्यामुळे आजच्या या सामन्यात नक्की कोण वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

किंग्जस इलेव्हन पंजाब : केएल राहुल (कर्णधार), हरप्रीत बरार, ईशान पोरेल, मनदीप सिंह, जेम्स निशाम, तजिंदर सिंह, ख्रिस जॉर्डन, करुण नायर, दीपक हुड्डा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सरफराज खान, शेल्डन कॉट्रेल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नलकांडे, निकोलस पूरन, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन, जगदीश सुचित, कृष्णप्पा गौतम, हार्डस विलोजेन आणि सिमरन सिंह.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), खगिसो रबाडा, मार्कस स्टोयनिस, संदीप लामिछाने, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमेयर, एलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल, प्रविण दुबे, एनरिच नोर्तजे , डेनियल सॅम्स

संबंधित बातम्या :

IPL 2020 DC vs KXIP : सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सची किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात

IPL 2020, KXIP vs DC : दिल्लीसाठी दिलासादायक बातमी, ‘हा’ आक्रमक खेळाडू दुखापतीतून बरा, पंजाबविरुद्ध खेळण्याची शक्यता

IPL 2020, KXIP vs DC : ‘गब्बर’ शिखर धवनला ‘जब्बर’ कामगिरी करण्याची संधी

IPL 2020 Kxip vs Dc Live Score Update Today Cricket Match Kings Eleven Punjab vs Delhi Capitals Live