IPL 2020 | नजफगढचा नवाब वीरेंद्र सेहवागची आयपीएल 2020 मधील ड्रीम टीम, ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी निवड

| Updated on: Nov 11, 2020 | 9:32 PM

सेहवानगे आपल्या या टीममध्ये बंगळुरुच्या 4, मुंबई, पंजाब आणि हैदराबादच्या प्रत्येकी 2 आणि दिल्लीच्या एका खेळाडूला स्थान दिलं आहे.

IPL 2020 | नजफगढचा नवाब वीरेंद्र सेहवागची आयपीएल 2020 मधील ड्रीम टीम, या खेळाडूची कर्णधारपदी निवड
Follow us on

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL2020) मोसमातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने मात केली. यासह मुंबईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामिगिरी केली. विजेतेपदानंतर आता वेळ आहे ती आयपीएलच्या या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन टीम बनवण्याची. साधारणपणे कोणत्याही मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर स्पर्धेतील प्लेइंग इलेव्हन टीम बनवण्यात येते. संपूर्ण मोसमात चमकदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी खेळाडूंची एक टीम बनवण्यात येते. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आयपीएलच्या 13 व्या मोसमातील प्लेइंग इलेव्हन (Virender Sehwag) टीम बनवली आहे. ipl 2020 virendra sehwag playing eleven team in ipl 2020 captain virat kohli

सेहवागने क्रिकबझच्या एका कार्यक्रमादरम्यान या टीमची निवड केली. सेहवागने या टीममध्ये बंगळुरुचा देवदत्त पडीक्कल (Devdutt Padikkal) आणि पंजाबचा कर्णधार केएल राहुल (K L Rahul) या दोघांनी सलामीवीर म्हणून पसंती दिली आहे. सेहवागने या दोघांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. या मोसमात या दोन्ही फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. राहुलने या मोसमात एकूण 670 धावा केल्या आहेत. तो या मोसमातील ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. तर देवदत्त पडीक्कल या मोसमातील सर्वात जास्त धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेला खेळाडू म्हणजे अनॅकप्ड. पडीक्कलने या मोसमात 473 धावा केल्या आहेत.

सूर्यकुमार यादव वनडाऊन

सेहवागने मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) तिसऱ्या क्रमांकावर म्हणजेच वनडाऊन म्हणून निवड केली आहे. सूर्यकुमार मागील 3 मोसमांपासून सातत्याने चमकदार कामगिरी करतोय. “सूर्याने मागील तीन मोसमांमध्ये सातत्याने धावा केल्या आहेत. काही वेळा त्याने निर्णायक भूमिका बजावली आहे”, असं सेहवाग म्हणाला.

विराटला कर्णधार म्हणून पसंती

सेहवागने आपल्या ड्रीम टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीला (Virat Kohli)दिली आहे. म्हणजेच सेहवागच्या या ड्रीम टीमचा विराट कर्णधार आहे. विराटने या मोसमात एकूण 450 धावा केल्या. मात्र यावेळेस तो नेहमीच्या रुपात फलंदाजी करताना दिसला नाही. विराटच्या नेतृत्वावर या वेळेस अनेक जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशातही सेहवागने विराटला का संधी दिली, असा प्रश्न उपस्थित होतो. याबाबत सेहवाग म्हणाला, “विराट नेहमीच चौथ्या क्रमांकावर खेळताना चांगली फलंदाजी करतो. यामुळे मी त्याला नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. विराट आक्रमक खेळाडू आणि कर्णधार आहे. तो संघाला सोबत घेत चालतो. ”

वॉर्नरला पाचव्या क्रमांकावर संधी

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला (David Warner)पाचव्या क्रमांकावर संधी दिली आहे. हैदराबादने वॉर्नरच्या नेतृत्वात सलग 4 सामन्यात विजय मिळवून एलिमिनेटर पर्यंत मजल मारली.

सहाव्या क्रमांकावर मिस्टर 360

आयपीएलमध्ये सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कायरन पोलार्ड Kieron Polard) हे खेळाडू आक्रमक फलंदाजी करतात. मात्र यांना डच्चू देत सेहवागने बंगळुरुच्या एबी डीव्हीलियर्सला (A B Devilliars)संधी दिली आहे.

गोलंदाजीची जबाबदारी रबाडा-बुमराहकडे

सेहवागने आपल्या ड्रीम टीमच्या गोलंदाजाची जबाबदारी मुंबईच्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)आणि दिल्लीच्या कगिसो रबाडाला (Kagiso Rabada)दिली आहे. कगिसो या मोसमात 30 विकेट्स घेत पर्पल कॅप विनर (Kagiso Rabada Purple Cap Holder 2020) ठरला आहे. तर बुमराह आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच पंजाबच्या मोहम्मद शमीला (Mohhamad Shami) तिसरा गोलंदाज म्हणून समाविष्ट केलं आहे.

चहल-खान फिरकी जोडी

सेहवागने फिरकीची धूरा हैदराबादच्या राशिद खान (Rashid Khan) तर बंगळुरुच्या युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) खांद्यावर दिली आहे. चहलने या मोसमात टीम संकटात असताना निर्णायक क्षणी विकेट्स मिळवून दिल्या आहेत. तर राशिद खानने आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल केली आहे. या मोसमात सर्वाधिक सिक्स खेचणाऱ्या मुंबईच्या इशान किशनचा (Ishan Kishan) 12 व्या क्रमांकावर स्थान दिलं आहे.

सेहवागची टीम : केएल राहुल, देवदत्त पडीक्कल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली(कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एबी डी व्हीलियर्स, राशिद खान, युजवेंद्र चहल, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी, ईशान किशन(12वा खेळाडू)

संबंधित बातम्या :

IPL 2021 | आयपीएलच्या नव्या मोसमात नवी टीम दिसण्याची शक्यता, बीसीसीआयची जोरदार तयारी

IPL 2021 | आयपीएल संपण्यापूर्वीच नव्या मोसमाचं नियोजन, 4 महिन्यांनी पुन्हा चौकार-षटकार?

ipl 2020 virendra sehwag playing eleven team in ipl 2020 captain virat kohli