IPL 2021 | अक्षर पटेलनंतर दिल्ली कॅपिट्ल्सच्या आणखी एका स्टार खेळाडूला कोरोनाची लागण

| Updated on: Apr 14, 2021 | 4:19 PM

दिल्ली कॅपिट्लसच्या आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. वेगवान गोलंदाज (Delhi Capitals Pacer) एनरिच नॉर्खियाचा कोरोना अहवाल (anrich nortje tested Corona positive) पॉझिटिव्ह आला आहे.

IPL 2021 | अक्षर पटेलनंतर दिल्ली कॅपिट्ल्सच्या आणखी एका स्टार खेळाडूला कोरोनाची लागण
दिल्ली कॅपिट्लसच्या आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. वेगवान गोलंदाज (Delhi Capitals Pacer) एनरिच नॉर्खियाचा कोरोना अहवाल (anrich nortje tested Corona positive) पॉझिटिव्ह आला आहे.
Follow us on

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) यांच्यानंतर आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीचा वेगवाग गोलंदाज एनरिच नॉर्कियाला (anrich nortje) कोरोनाची लागण झाली आहे. क्रिकबझने याबाबतचे वृत्त दिलं आहे. नॉर्कियाला कोरोना झाल्यामुळे दिल्लीच्या गोटात भितीचं वातावरण आहे. नॉर्कियाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने इतर खेळाडूंवरही टांगती तलवार आहे. (Ipl 2021 Delhi Capitals Pacer anrich nortje tested Corona positive)

दिल्लीचा दुसरा खेळाडू

नॉर्किया नुकताच पाकिस्तान विरुद्ध मालिका खेळून आयपीएलसाठी भारतात आला. नॉर्किया सेल्फ आयसोलेशनमध्ये होता. मात्र त्यानंतरही त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे नॉर्कियाचा आयसोलेशनमध्ये जाण्याआधीचा रिपोर्ट हा नेगेटिव्ह आला होता. नॉर्किया कोरोनाची बाधा होणारा दिल्लीचा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी अक्षर पटेललाही कोराना झाला होता. 14 व्या मोसमाआधी त्याला कोरोनाची लागण झाली होती.

बंगळुरुचे 3 खेळाडू पॉझिटिव्ह

नॉर्किया व्यतिरिक्त बंगळुरुच्या 3 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये देवदत्त पडीक्कल, डॅनियल सॅम्स आणि अॅडम झॅम्पाचा समावेश होता.

मागील मोसमात विक्रम

कोरोनामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. या मोसमात नॉर्कियाने विक्रम केला होता. नॉर्कियाने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने गोलंदाजी केली होती. नॉर्कियाने 156.2 ताशी किमी इतक्या वेगाने चेंडू फेकला होता. त्याने ही कामगिरी राजस्थान रॉयल्स विरुद्ध केली होती. जॉस बटलरने या चेंडूचा सामना केला होता. विशेष म्हणजे यानंतरच्या पुढील चेंडूवर नॉर्खियाने बटलरला बोल्ड केलं होतं. हा चेंडू नॉर्खियाने 155.1 ताशी किमी इतक्या वेगाने टाकला होता.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात 15 दिवसांची संचारबंदी, मुंबईतले IPL 2021 चे सामने रद्द करावे लागणार?

Icc Odi Player Ranking | बाबर आझमची गरुड भरारी, विराट कोहलीला पछाडत पटकावलं पहिलं स्थान

IPL 2021 SRH vs RCB Head to Head Records : विराट की वॉर्नर, आजच्या सामन्यात कोणाचं पारडं जड?

(Ipl 2021 Delhi Capitals Pacer anrich nortje tested Corona positive)