IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच गमावल्यानंतर के एल राहुलला दु:ख, म्हणतो, ‘माझ्याजवळ बोलायला…’

| Updated on: Apr 17, 2021 | 9:50 AM

"माझ्याजवळ बोलायला अधिक काहीच नाहीय. जर संघ सुरुवातीलाच 5 विकेट्स गमावत असेल तर बोलायला खाली काय उरतं?, चेन्नईच्या संघाने फार उत्तम बोलिंग केली. खास करुन दीपक चहरने कमालीची बोलिंग टाकली, असं राहुल म्हणाला. (IPL 2021 PBKS vs CSK KL Rahul Comment After Lose Match Against CSK)

IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच गमावल्यानंतर के एल राहुलला दु:ख, म्हणतो, माझ्याजवळ बोलायला...
के एल राहुल
Follow us on

मुंबई :  चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) या दोन संघादरम्यान आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) आठवी लढत पार पडली. या लढतीत धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई संघाने राहुलच्या (KL Rahul) पंजाब संघावर 6 विकेट्सने मात केली. चेन्नईकडून पराभवाचं तोंड पाहायला लागल्यानंतर पंजाबचा कर्णधार नाराज झालेला पाहायला मिळाला. “आम्ही कमीत कमी 150 ते 160 धावा करायला हव्या होत्या”, अशी कमेंट करत त्याने पराभवाचं खापर पंजाबच्या बॅट्समनवर फोडलं. (IPL 2021 PBKS vs CSK KL Rahul Comment After Lose Match Against CSK)

मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळल्या गेलेल्या या लढतीत चेन्नईने पंजाबला 6 विकेट्सने हरवलं. टॉस जिंकून चेन्नईने प्रथम बोलिंग करण्याचा निर्यण घेतला. धोनीचा तो निर्णय चेन्नईचा जलदगती गोलंदाज दीपक चहरने सार्थ ठरवला. त्याने सुरुवातीच्या काहीच ओव्हर्समध्ये पंजाबच्या 4 बिग हिटर्स फलंदाजांना तंबूत पाठवलं. पंजाबच्या शाहरुख खानच्या 47 धावा वगळता एकाही फलंदाजाला चमकदार कामगिरी करण्यात यश आलं नाही.

चेन्नईविरुद्धची मॅच गमावल्यानंतर के एल राहुलला दु:ख

चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. निराशाजनक पराभवानंतर के एल राहुल नाराज झाला होता.

“माझ्याजवळ बोलायला अधिक काहीच नाहीय. जर संघ सुरुवातीलाच 5 विकेट्स गमावत असेल तर बोलायला खाली काय उरतं?, चेन्नईच्या संघाने फार उत्तम बोलिंग केली. खास करुन दीपक चहरने कमालीची बोलिंग टाकली. जडेजाने मला रनआऊट केलं तसंच गेलचा उत्तम कॅच घेतला. मुंबईची विकेट इतकीही खराब नव्हती. या विकेटवर 150 ते 160 धावा व्हायला हव्या होत्या. परंतु आम्ही केवळ 100 धावा क्रॉस करु शकलो”, अशा भावना पराभवानंतर राहुलने बोलून दाखवल्या.

पराभवातून शिकायला लागेल

“आता चेन्नईकडून जरी पराभव स्वीकारावा लागला असला तरी येणाऱ्या सामन्यात याच पराभवातून शिकायला लागणार आहे. मला अपेक्षा आहे की पुढच्या सामन्यात आम्ही झालेल्या चुकांची पुनरावृत्ती करणार नाही. आम्ही प्लॅन करु आणि त्याची अंमलबजावणी करु”, असंही राहुल म्हणाला.

(IPL 2021 PBKS vs CSK KL Rahul Comment After Lose Match Against CSK)

हे ही वाचा :

पंजाबच्या डावाला खिंडार पाडणाऱ्या दीपक चहरच्या खांद्यावर धोनीला द्यायचीय ‘ही’ नवी जबाबदारी

‘बापाचा पैसा उडवतेस’ म्हणणाऱ्या महिलेला सचिनची लेक सारा तेंडुलकरचं सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाली…

आयपीएल सामन्यांचा थरार सुरु, मात्र मोहम्मद शमीला खंत, सांगितली मनातली गोष्ट!