IPL 2023 LSG vs DC | अक्षर पटेलच्या फिरकीपुढे कायल मायर्सचं वादळ शमलं, असा पाठवला तंबूत पाहा Video

लखनऊ सुपर जायन्ट्सच्या कायल मायर्सला टाकलेल्या चेंडूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. चेंडू इतका आत घुसला की कायलला कळलंच नाही.

IPL 2023 LSG vs DC | अक्षर पटेलच्या फिरकीपुढे कायल मायर्सचं वादळ शमलं, असा पाठवला तंबूत पाहा Video
IPL 2023 LSG vs DC | अक्षर पटेलच्या फिरकीपुढे कायल मायर्सचं वादळ शमलं, असा पाठवला तंबूत पाहा Video
Image Credit source: Twitter
| Updated on: Apr 01, 2023 | 9:16 PM

मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा वर्षावर सुरु झाला आहे. फलंदाज आक्रमकपणे गोलंदाजांवर तुटून पडत आहेत. तसं पाहिलं आयपीएल टी 20 क्रिकेट फॉर्मेट पूर्णत: फलंदाजांच्या बाजूने झुकलेला आहे. पण असं असलं तरी गोलंदाज आपला कसं लावत फलंदाजांना रोखतात. अशीच काहीशी अनुभती दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायन्ट्स या सामन्यात आली. आक्रमकपणे खेळणाऱ्या कायल मायर्सचं वादळ अक्षरच्या फिरकीपुढे शमलं. कारण त्याने टाकलेला चेंडू कायलला कळलाच नाही.

डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या अक्षर पटेलने कायलला राउंड दी विकेटवरून गोलंदाजी केली. त्यामुळे डावखुऱ्या कायल मेयर्सला त्याचा चेंडूच कळला नाही. पिचवर एकदम बाहेर टाकलेला चेंडू आत घुसला त्याचा त्रिफळा उडाला. त्यामुळे काही क्षण कायलला कळलंच नाही काय झालं ते. मात्र मागे त्रिफळा उडाल्याचं पाहून तंबूत परतला.

कायल मायर्सनं 38 चेंडूत 73 धावांची आक्रमक खेळी केली. यात 7 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. आक्रमक खेळी पाहून या हंगामातलं पहिलं शतक ठोकतो की काय असं वाटत होतं. पण अक्षर पटेलच्या सुपर बॉलमुळे त्याला तंबूत परतला.

लखनऊचा पूर्ण स्क्वॉड : केएल राहुल, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, आशुष बडोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा, कृणाल पंड्या, कायल मायर्स, मार्कस स्टोयनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवि बिश्नोई, जयदेव उनादकट, यश ठाकुर, रोमारियो शेफर्ड, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सैम्स, प्रेरक मांकड, स्वप्निल सिंह, नवीन उल हक, युद्धवीर सिंह.

दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.