IPL 2024 GT vs RCB Live Streaming : गुजरात विरुद्ध बंगळुरु आमनेसामने, कोण जिंकणार?

Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru Live Streaming : रविवारी 28 एप्रिल रोजी आयपीएलच्या 17 व्या मोसमात डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात विरुद्ध आरसीबी असा सामना होणार आहे.

IPL 2024 GT vs RCB Live Streaming : गुजरात विरुद्ध बंगळुरु आमनेसामने, कोण जिंकणार?
Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 8:56 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 45 न्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. शुबमन गिल गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणार आहे. तर फाफ डु प्लेसीस याच्याकडे आरसीबीची जबाबदारी आहे. आरसीबीने सलग 6 पराभवानंतर आणि 1 महिन्याने दुसरा विजय मिळवला आहे. तर गुजरात सातत्य राखण्यात अपयशी ठरतेय. आरसीबीचं प्लेऑफसाठीचं समीकरण हे जवळपास संपुष्टात आलं आहे. मात्र गुजरातला या शर्यतीत कायम रहायचं असेल, तर पुढील प्रत्येक सामन्यात त्यांना विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे गुजरातसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, गुजरात आणि आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या आणि दहाव्या स्थानी आहे. गुजरातने शुबमनच्या गिलच्या नेतृत्वात 9 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने 9 मधून 2 सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं आहे. गुजरातचा नेट रनरेट हा -0.974 असा आहे. तर आरसीबीचा नेट रनरेट हा -0.721 असा आहे. दरम्यान गुजरात विरुद्ध आरसीबी या सामन्याबाबत आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

गुजरात विरुद्ध आरसीबी सामना केव्हा?

गुजरात विरुद्ध आरसीबी सामना हा रविवारी 28 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे.

गुजरात विरुद्ध आरसीबी सामना कुठे?

गुजरात विरुद्ध आरसीबी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

गुजरात विरुद्ध आरसीबी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

गुजरात विरुद्ध आरसीबी सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

गुजरात विरुद्ध आरसीबी सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

गुजरात विरुद्ध आरसीबी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

गुजरात विरुद्ध आरसीबी सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

गुजरात विरुद्ध आरसीबी सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.

गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कॅप्टन), ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर, साई सुधरसन, शरथ बीआर, मानव सुतार , विजय शंकर, दर्शन नळकांडे, मॅथ्यू वेड, उमेश यादव, केन विल्यमसन, जयंत यादव, अभिनव मनोहर, जोशुआ लिटल, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन आणि सुशांत मिश्रा.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू टीम : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल, सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, हिमांशू शर्मा, विजयकुमार वैशाख, स्वप्नील सिंग, ग्लेन मॅक्सवेल, रीस टोपले, टॉम कुरन आणि मयंक डागर, अल्झारी जोसेफ, मनोज भडांगे, आकाश दीप, सौरव चौहान आणि राजन कुमार.

Non Stop LIVE Update
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्.
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?.
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार.
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?.
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित.
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.