लसिथ मलिंगा हार्दिकला मिठी मारायला गेला आणि…! ‘तो’ व्हिडीओ पाहून मुंबई इंडियन्स फॅन्सचा संताप

आयपीएल 2024 स्पर्धेच्या सुरुवातीपासून मुंबई इंडियन्सचे तारे फिरले आहे. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या फॅन्सने संताप व्यक्त केला आहे. त्यात हार्दिक पांड्या आणि लसिथ मलिंगा यांचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहून मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची तळपायाची आग मस्तकात गेली आहे.

लसिथ मलिंगा हार्दिकला मिठी मारायला गेला आणि...! 'तो' व्हिडीओ पाहून मुंबई इंडियन्स फॅन्सचा संताप
हार्दिक पांड्या आणि मलिंगामध्ये नेमकं झालं तरी काय? त्या व्हिडीओनंतर मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची आगपाखडImage Credit source: video grab
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 2:49 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर मुंबई इंडियन्सचे फॅन्स संतापले आहेत. इतक्या वाईट पद्धतीने पराभूत होणं चाहत्यांना रुचलेलं नाही. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून ते हार्दिक पांड्याला सोपवल्यापासून सोशल मीडियावर टीकेचं रान उठलं आहे. इतकंच काय तर गुजरात विरुद्धच्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याला वाईट पद्धतीने ट्रोल केलं गेलं. सोशल मीडियावर सर्व सीमा ओलांडून आता टीकेचा भडीमार सुरु आहे. माजी क्रिकेटपटूंही हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जसप्रीत बुमराहला गोलंदाजीपासून लांब ठेवल्याने पराभव झाल्याचा ठपकाही ठेवला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे. त्यात आता सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि गोलंदाज प्रशिक्षक लसिथ मलिंगा यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाला दूर करत असल्याचं दिसत आहे. पण या व्हिडीओच्या सत्यतेबाबत अस्पष्टता आहे. असं असूनही फॅन्स आपला अंदाज बांधून टीका करत आहेत.

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुसरा सामना पार पडला. हा सामना मुंबई इंडियन्सने 31 धावांनी गमावला. या सामन्यानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एकमेकांना हस्तांदोलन आणि मिठी मारत होते. हार्दिक पांड्या आणि लसिथ मलिंगा समोरासमोर आले तेव्हा त्याने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिकने त्याला दूर केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

यापूर्वीही पांड्या आणि मलिंगाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हार्दिक पांड्या डगआऊटमध्ये येताच मलिंगा उठून गेला होता.हा प्रकार मुंबई इंडियन्सच्या डावात हार्दिक पांड्याने पॅड घातल्यानंतर घडला होता. हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजी उतरणार होता. मलिंगा आणि किरोन पोलार्ड एकत्र बसले होते. कॅप्टन हार्दिक पांड्या त्यांच्याकडे पाहिले, तेव्हा पोलार्डने जागा देण्याचा प्रयत्न केला. पण पोलार्ड उठण्याआधीच मलिंगा तिथून उठून गेला होता.

आता मुंबई इंडियन्सचे चाहते व्हायरल व्हिडीओचा त्यांच्या पद्धतीने अर्थ लावत आहे. कदाचित तसं काही नसेलही पण चाहत्यांवर कंट्रोल ठेवणं कठीण आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याला आता पुढच्या सामन्यात आपल्या खेळीतूनच विरोधकांची तोंड बंद करावी लागतील.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.