
राजस्थान रॉयल्सचा युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशीसाठी आयपीएल 2025 चा सीजन खूपच संस्मरणीय ठरला. त्याने दमदार फलंदाजीने सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. भले राजस्थान रॉयल्सची टीम साखळी फेरीतच प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाली. पण वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर आज देखील चर्चा आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय. त्यात वैभव सूर्यवंशी कथितरित्या कर्नल सोफिया कुरैशींसोबत दिसतोय. वैभव सूर्यवंशीने कर्नल सोफिया कुरैशीची भेट घेतली, असा दावा केला जात आहे. या फोटोमागच सत्य काय आहे, जाणून घ्या.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये वैभव सूर्यवंशी कर्नल सोफिया कुरैशी यांच्या शेजारी उभा आहे. हा फोटो कुठल्या अधिकृत समारंभामधला नाहीय. दुसरीकडे वैभव आणि कर्नल सोफिया यांच्या भेटीची कुठलीही माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाहीय. यावरुन हा फोटो बनावट असल्याच स्पष्ट होतो. या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे. सोशल मीडियावर खोटे दावे केले जात आहेत. असं होण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी त्याचा प्रिती झिंटासोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. पण तो फोटो सुद्धा फेक होता.
कर्नल सोफिया कुरैशी कुठे राहतात?
कर्नल सोफिया कुरैशी भारतीय सैन्यातील एक सन्मानीय अधिकारी आहेत. त्या आपलं शौर्य आणि नेतृत्वासाठी ओळखल्या जातात. सोफिया कुरैशी या गुजरातमधील बडोदा शहराच्या निवासी आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर केलं. या ऑपरेशनमध्ये भारताने केलेल्या कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी माध्यमांना दिली होती. पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणला होता.
वैभव किती सामने खेळला?
वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2025 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने नाव कमावलय. वैभवने 19 एप्रिल 2025 रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्याने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात केली. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर 28 एप्रिल 2025 रोजी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने 35 चेंडूत शतक झळकवून T20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. तो या सीजनमध्ये एकूण 7 सामने खेळला. त्याने 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या.