AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीचं ताकदीचं गुपित अखेर उघड ! आवडते खास पिवळी मिठाई..

Vaibhav Sooryavanshi favourite food : इंडियन प्रीमिअर लीग 2026 मध्ये शानदार खेळीने सीझन गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. वैभवने संपूर्ण हंगामात 776 धावा केल्या. एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. वैभवला इतके लांब षटकार मारण्याची ताकद अखेर येते कुठून, असा प्रश्न चाहत्यांना पडला असेल.

Vaibhav Sooryavanshi : IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीचं ताकदीचं गुपित अखेर उघड ! आवडते खास पिवळी मिठाई..
72 षटकार ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीचा आवडता पदार्थ कोणता ?Image Credit source:
| Updated on: Jun 01, 2026 | 3:40 PM
Share

अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमिअर लीग मध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीने खळबळ उडवून दिली. सचिन तेंडुलकरपासून ते सुनील गावसकर यांच्यापर्यंत अनेकजण वैभवचे चाहते बनलेत.  इतक्या लहान वयात त्याने ज्या प्रकारे नामवंत गोलंदाजांची धुलाई केली, ते पाहून सर्वजण थक्क झालेत. त्याच्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे.  ज्या वयात लहान मुले खांद्यावर शाळेची दप्तरे घेऊन फिरतात, त्या वयात वैभवला एवढी दमदार बॅटिंग, शानदार फटेकबाजी करण्याची ऊर्जा कुठून मिळते, हे सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे. या 15 वर्षांच्या ‘बेबी बॉस’च्या ऊर्जेमागे रहस्य काय ? ते समोर आलंय.

विशेष गोष्ट म्हणजे वैभव सूर्यवंशीला जेवढी बॅटिंग आवडते, तितकीच त्याला खाण्याचीही आवड आहे. त्याला विशेषतः मांसाहारी पदार्थ आवडतात. एका मुलाखतीत वैभवने सांगितलं हतं की त्याला मटण खूप आवडतं. एवढंच नव्हे तर त्याला चिकन आणि माशांचे विविध पदार्थही आवडतात. हेच त्याच्या ताकदीचं रहस्या म्हणावं लागेल.   मांसाहारी पदार्थांव्यतिरिक्त वैभवला विविध गोड पदार्थ खायलाही खूप आवडतात. त्याचा सर्वात आवडता गोड पदार्थ म्हणजे (पिवळा) राजभोग. जर त्याला राजभोग खायला दिला, तर तो स्वत:ला ते खाण्यापासून रोखूच शकत नाही, अशीही माहिती उघड झाली.

आयपीएल 2026मध्ये सर्वाधिक धावा

यंदाचा आयपीएल सीझन पूर्णपणे वैभव सूर्यवंशीच्याच नावाने गाजला. जरी त्याचा संघ, राजस्थान रॉयल्स, दुर्दैवाने अंतिम फेरीत पोहोचू शकला नसला तरी वैभवची कामगिरी खूप प्रभावी होती. त्याने संपूर्ण हंगामात राजस्थानसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने आयपीएल 2026 च्या 16 सामन्यांमध्ये 776 धावा फटकावल्या, ज्यामुळे तो ऑरेंज कॅपचाही मानकरी ठरला. या सीझनमध्ये वैभवने एक शतक आणि 5 अर्धशतकं झळकावली. प्लेऑफमध्ये तो दोनदा शतक करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण दुर्दैवाने आऊट झाला.

सीझनमधील सर्वाधिक सिक्सही वैभवच्या नावे

आयपीएल 2026 मध्ये ऑरेंज कॅप जिंकण्यासोबतच, वैभवने या हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. त्याने या हंगामात एकूण 72 षटकार मारून वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलला मागे टाकलं. आयपीएल 2026 मध्ये षटकारांच्या बाबतीत वैभवच्या जवळपास कोणीही नाही. गुजरातचा कर्णधार शुभमन गिल 33 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...