AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Rohit Sharma : MI च्या पुढल्या मॅचपूर्वी चाहत्यांसाठी ती बातमी आलीच… रोहित शर्माबाबत मोठी अपडेट काय ?

GT vs MI: आयपीएल 2026 मधील 30 वा सामना हा गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स असा रंगणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रोहित शर्मा मैदानाबाहेर आहे, चाहते त्याच्या एंट्रीकडे डोळे लावून बसले आहेत. गुजरातविरुद्धच्या सामन्यात तरी रोहित शर्मा आतातरी खेळेल का असा प्रश्न सर्व चाहत्यांच्या मनात असून रोहितच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

IPL 2026 Rohit Sharma : MI च्या पुढल्या मॅचपूर्वी चाहत्यांसाठी ती बातमी आलीच... रोहित शर्माबाबत मोठी अपडेट काय ?
रोहित शर्मा बाबत मोठी अपडेटImage Credit source: PTI
| Updated on: Apr 20, 2026 | 11:22 AM
Share

Rohit Sharma Update : रोहित शर्माची दुखापत आता कशी आहे ? गुजरातविरुद्धच्या सामन्यात तरी तो आता खेळू शकेल का ? या प्रश्नांची उत्तरं अख्ख्या भारताला हवी आहेत. रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली असून याच इंज्युरीमुळेत तो पंजाब किंग्सविरुद्धचा मागचा सामना खेळू शकला नव्हत. मात्र आता तो सलग दुसऱ्या सामन्यासाठीही संघाबाहेर असेल का? असा सवाल सर्वांच्या मनात आहे. पण गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा हा नेटमध्ये सराव करताना दिसला, हे एक सकारात्मक चिन्ह मानलं जात आहे. मात्र असं असलं तरी तो येत्या सामन्यात खेळू शकेल की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

रोहितच्या जागी आलेल्या डिकॉकने झळकावलं शतक

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नव्हता, त्याच्या अनुपस्थितीत क्विंटन डी कॉकने रिकी पाँटिंगसोबत डावाची सुरुवात केली. हा डी कॉकचा या हंगामातील पहिलाच सामना होता, त्यावेळी खेलताना त्याने 7 षटकार आणि 8 चौकारांसह 60 चेंडूंमध्ये 112 धावा ठोकल्या. मात्र, क्विंटन डी कॉकने नाबाद शतक झकावूनही, पंजाब किंग्सविरुद्ध 195 धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरल्याने मुंबई इंडियन्सचा पराभव झाला.

रोहित शर्मा खेळणार की नाही ?

मात्र आता असा प्रश्न उद्भवतो की दुखापत बरी झाल्यावर रोहित तंदुरुस्त होऊन परत आल्यावर काय होईल? त्याच्या अनुपस्थितीत खेळलेल्या डी कॉकला पुन्हा बाहेर बसावं लागेल का? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी, रोहितच्या दुखापतीबद्दलच्या लेटेस्ट अपडेट्सवर एक नजर टाकूया. ‘रोहित शर्मा अहमदाबादमध्ये नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत आहे’ असं मुंबई इंडियन्सने एक निवेदन जारी करत म्हटलं आहे. यादरम्यान, वैद्यकीय पथक आणि मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांचं त्याच्यावर सतत लक्ष आहे. पण असं असलं तरीही गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात रोहित खेळणार की नाही यायाबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही.

रोहित खेळल्यास कोण जाणार बाहेर ?

दुखापत बरी होऊन जर रोहित शर्मा गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यासाठी संघात परतला, तर रिकल्टनला पुन्हा वगळलं जाण्याची दाट शक्यता आहे. शतक झळकावल्यानंतर आता क्विंटन डी कॉकला संघातून वगळणं हे कठीण दिसतंय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...