IPL Auction 2023: या 3 अष्टपैलू खेळाडूंवर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या टीमच्या मालकांची नजर, लिलावासाठी करोडो रुपयांची बोली लागणार

23 डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होणार आहे

IPL Auction 2023: या 3 अष्टपैलू खेळाडूंवर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या टीमच्या मालकांची नजर, लिलावासाठी करोडो रुपयांची बोली लागणार
ipl 2023
| Updated on: Dec 15, 2022 | 12:58 PM

मुंबई : भारतात (IND) होणाऱ्या आयपीएलची (IPL 2023) तयारी मागच्या महिन्यापासून सुरु झाली आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या दहा टीममध्ये कोणत्या खेळाडूला कायम केले, त्याची यादी सुद्धा बीसीसीआयकडे (BCCI) देण्यात आली आहे. त्यानंतर ज्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा आहे. त्यानंतर ज्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची इच्छा आहे. त्यांना बीसीसीआयने अर्ज करण्याची तारिख दिली होती. त्यांच्यासाठी आता हंगामी लिलाव होणार आहे.

23 डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होणार आहे, त्यामध्ये टीम इंडियाचे आणि परेदशातील खेळाडू असतील. त्यामध्ये तीन अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे त्यांच्यावर अधिक बोली लागण्याची शक्यता आहे.

बेन स्टोक्स हा खेळाडू सध्या अधिक चर्चेत आहे. मागच्यावर्षी त्याने काही कारणामुळे आयपीएलमधून विश्रांती घेतली होती. त्यामुळे राजस्थान रॉयलने त्याला टीममधून वगळलं होत. त्याला राजस्थान रॉयल्सने 12.5 कोटी रुपयात खरेदी केले होते. सध्याच्या हंगामी लिलावात त्याच्यावर किती बोली लागणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

शाकिब अल हसन हे नाव सुध्दा सध्या अधिक चर्चेत आहे. कारण त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. तो ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याला कोणती टीम लिलावामध्ये खरेदी करणार याकडे सुद्धा आयपीएलच्या चाहत्यांचं लक्ष असेल. आतापर्यंत शाकिब अल हसन यांनी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळला आहे.

सैम कुरेन हा इंग्लंडचा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी सुद्धा केली आहे. इंग्लंडने विश्वचषक जिंकला त्याच्यात कुरेनचा मोलाचा वाटा आहे. विशेष म्हणजे कुरेन याने आयपीएलमध्ये सुद्धा तुफान फलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याच्यावर सुध्दा अधिक बोली लागण्याची शक्यता आहे.