
आयपीएल 2024 स्पर्धेत तीन शतकं आली आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकी खेळीनंतर आता सनरायझर्स हैदराबादच्या ट्रेव्हिस हेडने शतक ठोकलं आहे. ट्रेव्हिस हेडने 39 चेंडूत शतक ठोकलं. त्यामुळे आयपीएल ऑरेंज कॅप शर्यतीत कोण कुठे याची उत्सुकता लागून आहे. विराट कोहलीचं अव्वल स्थान कायम आहे का? याबाबत अनेक प्रश्न पडले आहेत. तर विराट कोहलीचं ऑरेंज कॅप गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम आहे. विराट कोहलीने 20 चेंडूत 42 धावांची खेळी केली. 6 चौकार आणि 2 षटकार मारले. विराट कोहलीने 7 सामन्यात 361 धावा केल्या आहेत. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी इतर फलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रियान परागच्या 6 सामन्यात 284 धावा आहेत. या दोघांमध्ये 77 धावांचा फरक आहे. टी20 मध्ये 77 धावांचा फरक वाटतो तितका सोपा नाही. त्यामुळे विराट कोहली आणखी काही दिवस अव्वल स्थानी राहील यात शंका नाही.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 6 सामन्यात 264 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने चेन्नई विरुद्ध शतक ठोकत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याच्या नावावर 261 धावा आहेत. तर पाचव्या स्थानावर शुबमन गिल असून त्याने 255 धावा केल्या आहेत. हेन्रिक क्लासेनचं टॉप 5 मधील स्थान अवघ्या 2 धावांनी हुकलं. हेन्रिक क्लासेनने 6 सामन्यात 253 धावा केल्या आहेत. सातव्या स्थानावर शिवम दुबे 242 धावांसह आहे. पण ट्रेव्हिड हेड शतक ठोकून आहे कुठे हा प्रश्न जर असेल तर त्याचं उत्तर खाली आहे.
ट्रेव्हिस हेड शतकी खेळी करूनही आठव्या स्थानावर आहे. कारण मागच्या 4 सामन्यापैकी दोन सामन्यात बॅट चालली नाही. ट्रेव्हिस हेडने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं आहे. ट्रेव्हिस हेडच्या नावावर 235 धावा आहेत. त्यामुळे आठव्या स्थानावर समाधान मानावं लागेल. पुढच्या सामन्यात बॅट अशीच चालत राहिली तर टॉप 5 मध्ये एन्ट्री मिळू शकते.
दरम्यान, सनराझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 25 धावांनी पराभूत केलं. यासह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. नेट रनरेट काही अंशी फरक पडल्याने 8 गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ एकदम तळाशी आहे.