PAK W vs IRE W : थरारक, लास्ट बॉलवर SIX मारुन पाकिस्तान विरुद्ध विजय VIDEO, महिला क्रिकेटमध्ये पहिल्यांदा असं घडलं

PAK W vs IRE W : लास्ट बॉलवर सिक्स मारुन थेट विजय, पुरुष क्रिकेटमध्ये आतापर्यंत आपण अनेकदा असं होताना पाहिलय. पण महिला क्रिकेट विश्वात पहिल्यांदा अशी घटना घडलीय. महत्त्वाच म्हणजे पाकिस्तानच्या टीम विरुद्ध एका महिला क्रिकेटरने हा कारनामा केलाय. ही महिला क्रिकेटर मूळची गोलंदाज आहे.

PAK W vs IRE W : थरारक, लास्ट बॉलवर SIX मारुन पाकिस्तान विरुद्ध विजय VIDEO, महिला क्रिकेटमध्ये पहिल्यांदा असं घडलं
PAK W vs IRE W
Image Credit source: Screenshot/X
| Updated on: Aug 09, 2025 | 8:39 AM

मेन्स क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूवर सिक्स मारुन मॅच जिंकल्याच्या घटना आपण आतापर्यंत अनेकदा पाहिल्या आहेत. पण महिलांच्या T20I मॅचमध्ये 8 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा असं घडलं. आयर्लंडच्या एका महिला गोलंदाजाने हा कारनामा करुन दाखवला. तिने पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या T20 सामन्यात शेवटच्या चेंडूवर सिक्स मारुन विजय मिळवून दिला. सोबतच असा कारनामा करणारी ती जगातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. T20 मध्ये सिक्स मारुन मॅच जिंकवण्याचा कारनामा आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये झाला नव्हता. आयर्लंडच्या टीमने पाकिस्तान विरुद्ध तीन सामन्यांच्या T20 सीरीजमध्ये विजयी आघाडी घेतली आहे.

डबलिन येथे आयर्लंड आणि पाकिस्तानमध्ये दुसरा T20I सामना खेळला गेला. पाकिस्तानच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 169 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर आयर्लंडला विजयासाठी 4 धावांची गरज होती. स्ट्राइकवर आयर्लंडची जेन मॅग्वायर होती. मूळची ती गोलंदाज आहे. या मॅचआधी 26 सामन्यात तिने फक्त 13 धावा केल्या आहेत. तिने पाकिस्तानच्या सादिया इकबालच्या शेवटच्या चेंडूवर सिक्स मारुन आयर्लंड टीमला 4 विकेटने विजय मिळवून दिला.

पहिल्या सामन्यात पाकिस्तानला किती धावांनी हरवलं?

जेन T20I च्या इतिहासात असा कारनामा करणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे. तिने लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर सिक्स मारुन विजय मिळवून दिला. अशा प्रकारे आयर्लंडची टीम तीन T20 सामन्यांच्या सीरीजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या T20I सामन्यात यजमान आयर्लंडने पाकिस्तानला 11 धावांनी हरवलं होतं.

टॉस कोणी जिंकला?

दुसऱ्या टी 20 सामन्यात पाकिस्तान महिला टीमने टॉस जिंकून पहिली फलंदाजी स्वीकारली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 168 धावा केल्या. पाकिस्ताची ओपनर शवाल जुल्फिकारने सर्वाधिक 27 चेंडूत 6 चौकारांच्या बळावर 33 धावा केल्या. विकेटकीपर फलंदाज मुनीबा अली (27) सोबत मिळून पहिल्या विकेटसाठी 48 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. या दोघी आऊट झाल्यानंतर पाकिस्तानची धावगती मंदावली.


शेवटच्या चेंडूवर थरारक विजय

कॅप्टन फातिम सनाने 16 चेंडूत एक चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 23 धावा केल्या. एयमान फातिमा सुद्धा 16 चेंडूत 23 धावा करुन आऊट झाली. आयर्लंडकडून कारा मुरे आणि लारा मॅकब्राइडने दोन-दोन विकेट घेतले. लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या यजमान टीमने शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला.