जसप्रीत बुमराहचा नवा विक्रम, कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक

भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराहने (Jaspreet bumrah) कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक (Hat trick) घेऊन आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंद केला आहे.

जसप्रीत बुमराहचा नवा विक्रम, कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक

किंग्सटन (जमैका) : भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराहने (Jaspreet bumrah) कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक (Hat trick) घेऊन आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंद केला आहे. जसप्रीत हा कसोटी क्रिकेटमध्ये  हॅटट्रिक घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. भारत विरुद्ध वेस्टइंडीज सामन्या दरम्यान बुमराहने हा विक्रम केला आहे.

बुमराहच्या क्रिकेट करिअरमधील ही त्याची पहिली हॅटट्रिक आहे. यापूर्वी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांनी कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेतली होती. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा बुमराहा तिसरा खेळाडू ठरला आहे.

बुमराहने नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूत डेरेन ब्राव्होला झेलबाद केलं. यानंतर तिसऱ्या चेंडूत शामराह ब्रुक्सला शून्य धावांवर माघारी धाडलं. तर षटकात चौथ्या चेंडूत रोस्टन चेजलाही बाद करत बुमराहने नव्या विक्रमाची नोंद केली.

कसोटी क्रिकेटमधील पहिली हॅटट्रिक

कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून पहिल्या हॅटट्रिकचा विक्रम फिरकीपटू हरभजन सिंहच्या नावावर आहे. हरभजनने 2001 मध्ये कोलकातामध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात हा विक्रम केला होता. यानंतर 2006 मध्ये इरफान पठाणने पाकिस्तानविरोधात कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक केली होती.

दरम्यान भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्यातील पहिल्या डावात भारताने सर्वबाद 416 धावा केल्या. भारताकडून हनुमा विहारीने उत्कृष्ट खेळी करत 111 धावसंख्या केली. तर दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडीजची अवस्था 7 बाद 87 अशी झाली. विशेष म्हणजे यामधील 7 पैकी 6 खेळाडू एकट्या बुमराहने बाद केले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *