
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पोर्ट्स प्रेजेंटेटर संजना गणेशनसोबत विवाहबद्ध झाला आहे. या निमित्ताने आपण संजना बद्दल जाणून घेणार आहोत.

संजना ही प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेजेंटेटर आहे.

ती सध्या स्टार स्पोर्ट्ससोबत काम करत आहे. संजनाने आतापर्यंत अनेक कार्यक्रम होस्ट केले आहेत.

संजनाने कोलकाता नाईट रायडर्स या टीमसाठी अनेक शो होस्ट केले आहेत.

संजना स्पिलिट्सविला या रिअॅलिटी शोच्या 7 व्या मोसमातही सहभागी झाली होती.

तसेच संजनाने 2014 मध्ये मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं.

संजनानं 2012 मध्ये सिम्बायोसिसमधून बीटेक पर्यंत शिक्षण घेतलं आहे.

संजनाने काही वर्ष सॉफ्टवेअर इंजिनिअरचं कामही केलं आहे.