Suryakumar Yadav : त्यापेक्षा तो शॉट मारु नकोस, सुनील गावस्कर सरळ सूर्याला बोलले

Suryakumar Yadav : भारताने काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धरमशाळा येथील टी 20 सामना जिंकला. सीरीजमधील हा तिसरा सामना होता. मॅच जिंकलो ही आनंदाची बाब आहे. पण सूर्यकुमार यादवचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. त्याला सुनील गावस्कर यांनी कॉमेंट्री करताना एक सल्ला दिला आहे.

Suryakumar Yadav : त्यापेक्षा तो शॉट मारु नकोस, सुनील गावस्कर सरळ सूर्याला बोलले
Suryakumar Yadav
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 15, 2025 | 10:16 AM

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने विजय मिळवला असला, तरी सूर्यकुमार यादवचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. सूर्यकुमार यादव टीमचा कॅप्टन आहे. स्वत: आघाडीवर राहून इतरांसमोर आदर्श निर्माण करणं ही कर्णधाराची जबाबदारी असते. त्यात सूर्या सध्या कमी पडतोय. सूर्याला सुद्धा याची जाणीव आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग तीन सामन्यात तो अपयशी ठरली आहे. पहिल्या मॅचमध्ये 12, दुसऱ्या सामन्याच पाच आणि तिसऱ्या सामन्यात 12 धावांच सूर्या करु शकला. म्हणजे मालिकेतील तीन सामन्यात आतापर्यंत सूर्याने 29 धावा केल्या आहेत. सूर्या सारख्या खेळाडूला हे आकडे अजिबात साजेसे नाहीत. सूर्यकुमार यादव टीम इंडियाकडून फक्त टी 20 फॉर्मेटमध्ये खेळतो.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात सूर्या पुन्हा एकदा त्याचा फेव्हरेट पिकअप शॉट खेळण्यात अपयशी ठरला. फाईन लेगवरुन त्याने चेंडू सीमापार पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा टायमिंग चुकला. लुंगी निगिडीच्या गोलंदाजावर बार्टमॅनकडे त्याने सोपा झेल दिला. 35 वर्षीय सूर्यकुमार यादव बाद होताच कॉमेंट्री करणाऱ्या दिग्गज सुनील गावस्कर यांनी त्याला एक सल्ला दिला. “सूर्यकुमारने त्याचा पिकअप शॉट सध्या थंड बस्त्यात गुंडाळून ठेवावा आणि हा फटका खेळण्यासाठी योग्य वेळेची प्रतिक्षा करावी” असा सल्ला सुनील गावस्कर यांनी दिला आहे.

हे भारताला परवडणारं नाही

“या शॉटमुळे आतापर्यंत सूर्यकुमार यादवचा फायदा झाला आहे. पण जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये नसता, तेव्हा चेंडू सीमारेषेपार जाण्याऐवजी मैदानाच्या आतच राहणार असेल, तर धावा निघण्यापूर्वी तो फटका थंड बस्त्यात गुंडाळून ठेवावा” असं सुनील गावस्कर स्पष्टपणे म्हणाले. ‘कारण सूर्यकुमार यादव आऊट होणार, तो फक्त 12 रन्स करणारं हे भारताला परवडणारं नाही’ असं सुनील गावस्कर म्हणाले. भारतासाठी मागच्या 21 टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवही एकदाही अर्धशतकी खेळी करु शकलेला नाही. पुढच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात टी 20 वर्ल्ड कप आहे. त्याआधी सूर्यकुमारला सूर गवसणं आवश्यक आहे.