Suryakumar Yadav : आश्चर्य वाटेल, IPL 2025 मध्ये सूर्यकुमारच्या धावा बघा आणि तेच भारताकडून खेळताना अशी अवस्था, इतका फरक
Suryakumar Yadav : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा टी 20 सामना सहज जिंकला. दुसऱ्या मॅचमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. पण टीममधल्या दोन खेळाडूंचा फॉर्म अजूनही चिंतेचा विषय आहे. एक कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि दुसरा उपकर्णधार शुबमन गिल.

धरमशाळा येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तिसरा टी20 सामना झाला. भारताने ही मॅच सात विकेटने जिंकून सीरीजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत आता आघाडीवर आहे. पण आपण जिंकलो असलो, तरी दोन खेळाडूंचा फॉर्म हा टीमसाठी चिंतेचा विषय आहे. शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग तिसऱ्या मॅचमध्ये दोघे त्यांच्या बेस्ट फॉर्मपासून खूप लांब दिसले. शुबमन गिल टी 20 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार आहे, तर सूर्यकुमार यादव कॅप्टन आहे. शुबमनने 28 चेंडूत 28 धावा केल्या, तर सूर्यकुमार 11 चेंडूत फक्त 12 धावा करु शकला. शुबमनने 28 धावा केल्या म्हणून त्याच्या फॉर्मकडे थोडी डोळेझाक केली, तरी सूर्यकुमारच्या परफॉर्मन्सकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 2025 मध्ये सूर्यकुमारने एक अर्धशतक झळावलेलं नाही.
पहिल्या दोन सामन्यातील अपयशानंतर शुबमन गिलने 28 धावा केल्या असल्या तरी, त्या समाधानकारक नाहीत. कारण त्यासाठी त्याने 28 चेंडू घेतले. खरतंर टी 20 मध्ये कुठल्याही फलंदाजाकडून वेगाने धावा बनवणं अपेक्षित असतं. ओपनिंगला आल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या टीमवर फिल्डिंग रिस्ट्रीक्शन्स असतात, त्यामुळे वेगाने धावा बनवता येऊ शकतात. अशावेळी 28 चेंडूत 28 धावा समाधानकारक नाहीत. पहिल्या टी 20 मध्ये गिलने 4 आणि दुसऱ्या सामन्यात शुन्यावर बाद झाला होता.
त्याची सरासरी 15 पेक्षा कमी
दुसऱ्याबाजूला मुंबई इंडियन्सकडून खेळताना सूर्यकुमार यादवने IPL 2025 च्या सीजनमध्ये 700 धावा फटकावल्या होत्या. पण तेच टीम इंडियाकडून खेळताना त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीयत, धावा आटल्या आहेत. यावर्षात T20I मध्ये त्याची सरासरी 15 पेक्षा कमी आहे.
25 चेंडू राखून विजयी लक्ष्य गाठलं
तिसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. दक्षिण आफ्रिकेचा डाव 117 धावात गुंडाळला. हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंहने प्रत्येकी दोन विकेट काढले. दक्षिण आफ्रिकेकडून फक्त कर्णधार एडन मार्करमने अर्धशतकी खेळी केली. भारताने 25 चेंडू राखून विजयी लक्ष्य गाठलं. अभिषेक शर्मा आणि गिलने प्रत्येकी 35 आणि 28 धावा केल्या.
