Mukhyamantri Ladki Bahin Yoajana : अखेर नको तेच होणार, 31 डिसेंबर नंतर थेट… लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट काय ?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी बंधनकारक आहे. 31 डिसेंबरपर्यंत ते पूर्ण न केल्यास दरमहा मिळणारे 1500 रुपये थांबतील. अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. आता अंगणवाडी सेविका घरी जाऊन ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करणार आहेत, ज्यामुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत राहील.

आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या राज्यातील कोट्यवधी महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’मुळे (Mukhyamantri Ladki Bahin Yoajana) मोठा दिलासा मिळाला आहे. दर महिन्याला त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतात, त्यामुळे अनेक महिला सक्षमपणे त्यांच्या पायावर उभ्या राहू शकल्या आहेत. मात्र ही योजना सुरू करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या, या अटींना डावलून ज्या महिला पात्र नाहीत, त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राड्यातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यास सांगण्यात आलं, त्यामुळे अटी डावलणाऱ्या, अपात्र महिला योजनेचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत.
ज्या लाभार्थी महिलांची केवायसी असणार त्यांनाच यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. समजा एखादी महिला पात्र असूनही जर तीने केवायसी केली नाही तर तिचं नाव या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. खरंतर नोव्हेंबरपर्यंतच ई-केवायसीची मुदत होती, मात्र लाखो महिलांचे ई-केवायसी न झाल्याने ही मुदत वाढवून देण्यात आली होती. याचसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
31 डिसेंबरपर्यंत करा ई-केवायसी नाहीतर…
लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून ईकेवायसी बंधनकारक करण्यात आले. ईकेवायसीची मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत होती, मग ती वाढवून 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र त्यानंतरही अनेक महिलांना ईकेवायसी करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी संगणकीय प्रणालीत सुधारणा केल्यानंतर आता या ईकेवायसीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे.
त्याअंतर्गत ज्या महिलांचे ईकेवायसी अद्यापही झालेले नाही अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांची कागदपत्रे गोळा करून त्यांचे ईकेवायसी हे अंगणवाडी सेविकांकडून केले जाणार आहे. ई-केवायसीची प्रक्रिया अनेक महिलांकडून अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यात अडथळे येत होते. मात्र, आता अंगणवाडी सेविका स्वतः या महिलांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे तपासतील. या अंगणवाडी सेविकांच्या मदतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे सुलभ होणार आहे.
मात्र लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी केली नाही, तर मात्र त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गंत मिळणारे दरमहा 1500 रुपये मिळमआर नाही, त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार नाहीत.
लाडकी बहीण योजनेचे सध्या अडीच कोटी लाभार्थी आहेत. दरमहिन्याला या महिलांच्या खात्यात 1500 रुपये सरकारकडून जमा केले जातात. मात्र ईकेवायसीची अट टाकल्यामुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्याच मदतीसाठी अंगणवाडी सेविका या पुढे आल्या असून त्यांच्या सहाय्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकेल.
