AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट… आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं… म्हणाल्या, EKYC पासून अजून…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची E-KYC करण्याची अंतिम तारीख आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पूरस्थिती, कागदपत्रांची समस्या आणि एकल महिलांच्या विनंतीमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली असून, यामुळे लाखो पात्र महिलांना त्यांची E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट... आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं... म्हणाल्या, EKYC पासून अजून...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेटImage Credit source: social media
| Updated on: Nov 18, 2025 | 2:34 PM
Share

राज्यातील महायुती सरकारने गेल्या वर्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’  (MukhyaMantri Ladki Bahin Yojana) घोषणा केली. राज्यातील ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून त्याअंतगर्त पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात.आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून महिला या पैशांचा विनियोग वेगवेगळ्या प्रकारे करतात. मात्र या योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे समोर आले, त्यानंतर सरकारकडून पडताळणी सुरू करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या आदेशानुसार पात्र लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यास सांगण्यात आले. आज, म्हणजे 18 नोव्हेंबर ही ईकेवायसीची अंतिम तारीख होती.

मात्र बऱ्याच महिलांची ईकेवायसी पूर्ण झाली नसल्याचे समोर आल्यानंतर याची तारीख आता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना येत्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. यासंदर्भात महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे.

आदिती तटकरे स्पष्टच बोलल्या

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या केवायसीबद्दल महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे या स्पष्टपणे बोलल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी EKYC बाबत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सुरूवात करण्यात आली. आत्तापर्यंत राज्यातील 1 कोटी 20 लाख महिलांनी EKYC केलं आहे. तर अजून 50 लाख महिलांची काही प्रक्रिया अपूर्ण आहे. काही महिलांच्या भागात पूर आला, पूर परिस्थितीमुळे त्या महिलांनी दाखले, कागदपत्र गमावली आहेत. त्यामुळे त्यांना अद्याप EKYC प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. तसेच एकल महिला, विधवा महिला यांची विनंती होती की EKYCची ही मुदत थोडी वाढवावी.

त्यानुसार, आता EKYC करण्यासाठीची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवत आहे. यासाठीटचे डॉक्यूमेंट्स हे अंगणवाडी सेविकांकडे दिले तर त्या प्रक्रिया पूर्ण होतील. त्या कालावधीत वेबसाईदवर ऑप्शन्स देत आहोत. 5 लाख रोज अशी EKYC प्रकिया होत आहे, असे अदिती तटकरे म्हणाल्या.

1 जुलै पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. त्यानंतर काही सरकारी महिला यांचा लाभ घेत असल्याचे दिसून आले, त्यांचा लाभ बंद केला आहे. पोलिस भरती, सरकारी नोकरी लागल्यावर त्या महिला जेव्हा कागदपत्रे देतात तेव्हा आपण त्यांचे लाभ कमी करतो. कधी कधी जुन्या केसेस पुढे येतात आणि संभ्रम होतो . 12 हजार पुरुषांबाबत तसेच झाले. काही महिलांचे अकाउंट नव्हते आता आहे. या EKYC मुळे योजना सोपी झाली आहे, त्यामध्ये स्पष्टता आली आहे असेही अदिती तटकरे यांनी नमूद केलं.

म्हणून EKYC साठी दिली मुदतवाढ

सुरुवाती काळात सेवार्थचा आला होता. त्याबाबत प्रक्रिया त्यांची थांबवली. सरकारी चाळींमध्ये काही महिलांनी रक्कम परत केली. ही संख्या फार मोठी नाही, 1 टक्के पेक्षा आपली आहे. विभागाकडे ती रक्कम येणार नाही. जसे 65 वर्षापुढे जात आहेत तशी अपडेट होत आहे. भूकंप आणि अतिवृष्टी होत आहे. महसूल विभाग दाखल्यावर काम करतात, मंडळ अधिकारी तलाठी असतात, त्यांच्या पंचनाम्यात ती माहिती असते.महसूल यंत्रणेचा तो भाग आहे. या सर्व गोष्टींना कालावधी लागतो म्हणून आम्ही EKYC साठी मुदत वाढ दिली आहे असे अदित तटकरे यांनी स्पष्ट केलं.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.