महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नातसून होणार ‘ही’ अभिनेत्री, सांगितली पहिल्या रोमँटिक डेटची कहाणी
Love Life : कपूर कुटुंबासोबत असलेलं नात मोडल्यानंतर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची सून होणार प्रसिद्ध अभिनेत्री, आहे गडगंज श्रीमंत.., सांगितली पहिल्या रोमँटिक डेटची कहाणी... सध्या सर्वत्र दोघांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Love Life : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अशात एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना देखील उधाण आलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री तारा सुतारिया आहे. गेल्या काही दिवसांपासून तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे… वीर पहारिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर आणि तारा यांनी त्यांच्या नात्याची कबुली सर्वासमोर दिली आहे. एवढंच नाही तर, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत वीर आणि तारा यांनी त्यांच्या रोमँटिक डेटबद्दल सांगितलं आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत वीर म्हणाला, ‘मला खूप आनंद झाला की आमच्या पहिल्या भेटीपासूनच आमचं प्रेम आणि आपुलकी स्वीकारली. आम्ही कुठेही असलो तरी आमच्या भावना व्यक्त करण्यास कधीही मागेपुढे पाहित नाही आणि पाहिलं देखील नाही.’ शिवाय प्रेमाची सुरुवात कशी झाली याबद्दल देखील वीर आणि तारा यांनी चाहत्यांना सांगितलं.
कशी होती पहिली डेट?
वीर म्हणाला, ‘आमची पहिली डेट नाईट होती… जेथे मी पियानो वाजवत होतो आणि ती सूर्य उगवईपर्यंत गाणं गात होती…’ पुढे तारा म्हणाली, ‘प्रत्येक सुख – दुःखात एकमेकांची साथ देणं, जसं की आम्ही फार पूर्वीपासून एकमेकांना ओळखत आहोत…’
तारा म्हणाली, ‘मोठं होत असताना आईने आम्हाला कायम सांगितलं ‘ऑइल ऑफ कॅपरी’ त्या जागी आहे, ज्या जागी आपले सर्वांत चांगले मित्र होतात… कारण एक जुनी म्हण आहे, ‘जर तुम्ही बेटावरून जाताना बोटीवर असलेल्या या व्यक्तीला मिठी मारली तर तुम्ही कायमचे खास व्हाल आणि आम्ही तेच केलं.’
यावर वीर म्हणाला, “अर्थात, आमच्या दोघांसाठी अमाल्फी कोस्टवरील हे खूप खास ठिकाण होतं. आम्ही एकमेकांना ओळखण्यापूर्वीच, जेव्हा आम्हाला कळले की, आयुष्यातील खास व्यक्ती भेटली आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तारा आणि वीर यांच्या आयुष्याची चर्चा रंगली आहे.
तारा सुतारिया हिची नेटवर्थ
‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ सिनेमातून तारा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये तारा झळकली. रिपोर्टनुसार, तारा हिच्याकडे 2 – 3 कोटींची संपत्ती आहे. तर तिच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. तारा हिच्याकडे 43.61 लाख रुपयांची ऑडी क्यू3 आणि 1.16 कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ जीएलएस आहे. सोशल मीडियावर देखील तारा कायम सक्रिय असते.
कपूर कुटुंबासोबत ताराचं नातं…
रणबीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर यांचा चुलत भाऊ आदर जैन याला तारा डेट करत होती. पण आदर याने गर्लफ्रेंड आलेखा अडवाणी हिच्यासोबत लग्न केलं. म्हणून कपूर कुटुंबासोबत असलेले सर्व संबंध तारा हिने मोडले.
