AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओटीपी न घेता रॅपिडो प्रवास, अचानक बाईक पडक्या इमारतीजवळ वळवली अन् पुढे… कल्याणमधील त्या तरुणीने कसा वाचवला जीव?

कल्याणमध्ये ॲप-आधारित बाईक टॅक्सीने प्रवास करणाऱ्या तरुणीवर अत्याचार व लूट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी बाईकचालक सिद्धेश परदेशी याला अटक केली.

ओटीपी न घेता रॅपिडो प्रवास, अचानक बाईक पडक्या इमारतीजवळ वळवली अन् पुढे... कल्याणमधील त्या तरुणीने कसा वाचवला जीव?
rapido
| Updated on: Dec 15, 2025 | 8:15 AM
Share

ॲप-आधारित रिपिडो (Repido) बाईक टॅक्सी सेवेतून प्रवास करणाऱ्या एका तरुणीला कल्याणमध्ये निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची आणि चाकूचा धाक दाखवून लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या तरुणीने प्रसंगावधान राखून प्रतिकार करत चालत्या बाईकवरून उडी मारल्याने ही घटना समोर आली. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपी बाईक चालक सिद्धेश संदीप परदेशी (१९) याला अटक केली आहे. त्याला कल्याण न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे बाईक टॅक्सी सेवांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नेमके काय घडले?

कल्याण महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. पीडित तरुणी जिमसाठी एका नामांकित ॲपद्वारे बाईक टॅक्सी बुक करून प्रवास करत होती. आरोपीने तिला घराजवळून पिकअप केले. मात्र प्रवासाचा मेसेज आला नसल्याने तरुणीने ओटीपी विचारला. या दरम्यान, सिंधीगेट चौकाच्या दिशेने जात असताना आरोपी बाईकचालक सिद्धेश परदेशी याने अचानक बाईक निर्जन भागातील एका पडक्या इमारतीकडे वळवली.

तरुणीचा धाडसी प्रतिकार

चालकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तरुणीने कोणतीही भीती न बाळगता चालत्या बाईकवरून उडी मारली. यात तिच्या पायाला दुखापत झाली. तरीही आरोपीने तिला अंधारात ओढत नेत चाकूचा धाक दाखवला. त्याने तरुणीकडील सोन्याची आणि मोत्याची माळ तसेच एक हजार रुपये रोख हिसकावून घेतले. इतकेच नाही तर आरोपीने स्प्रे दाखवत ॲसिड हल्ल्याची धमकीही दिली. मात्र तरुणीने जोरदार प्रतिकार करून आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली. तिने आरडाओरडा सुरू केला. तरुणीचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक तात्काळ जमा झाले. नागरिकांनी बाईकचालकाला पकडून त्याला चोप दिला आणि नंतर महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी सिद्धेश संदीप परदेशी याला अटक केली. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे ॲप-आधारित बाईक टॅक्सी सेवा वापरणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात.