AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात किती गॅस सिलिंडर ठेवता येतात? मर्यादा ओलांडल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास, वाचा नियम

LPG Shortage : देशात एलपीजीची कमतरता निर्माण झाल्यामुळे काही लोक घरात सिलिंडरचा साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपण घरात किती सिलिंडर ठेवता येतात याबाबत माहिती जाणून घेऊयात.

घरात किती गॅस सिलिंडर ठेवता येतात? मर्यादा ओलांडल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास, वाचा नियम
lpg in HouseImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 15, 2026 | 5:26 PM
Share

मध्य पूर्वेतील युद्दाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. जहाजांची वाहतूक विस्कळित झाल्यामुळे संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. काही लोक घरात सिलिंडरचा साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा लोकांचा हा निर्णय केवळ धोकादायक नाही तर नियमबाह्य देखील आहे. सरकार आणि तेल कंपन्यांनी एलपीजी कनेक्शन आणि सिलेंडर ठेवण्याबाबत कडक नियम केले आहेत. हे नियम मोडल्यास संबंधित व्यक्तीला तुरुंगवास देखील होऊ शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वन हाउस, वन कनेक्शनचा नियम

भारतात एलपीजी कनेक्शनबाबत वन हाउस, वन कनेक्शन हा नियम लागू आहे. एका घरात फक्त एकच एलपीजी कनेक्शन वैध मानले जाते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची इंडेन गॅस, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची एचपी गॅस आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची भारत गॅस या कंपन्यांतर्फे ग्राहकांना कनेक्शन दिले जाते. जर एखाद्या ग्राहकाकडे आधीच एखाद्या कंपनीचे कनेक्शन असेल, तर त्याच पत्त्यावर दुसऱ्या कंपनीचे कनेक्शन घेणे नियमांच्या विरोधात मानले जाते. मात्र ग्राहकांना एकाच कंपनीचे डबल सिलेंडर कनेक्शन मिळू शकते. यात एका कनेक्शनवर दोन सिलिंडर मिळतात.

घरात किती सिलिंडर ठेवणे कायदेशीर?

नियमानुसार, घरगुती ग्राहकांसाठी एका कनेक्शनवर दोन सिलेंडर ठेवणे सामान्य मानले जाते. त्यापैकी एक सिलेंडर वापरात असतो, तर दुसरा राखीव म्हणून ठेवला जाऊ शकतो. तसेच एक ग्राहक वर्षभरात जास्तीत जास्त 15 घरगुती सिलिंडर घेऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीने वैध परवानगीशिवाय गरजेपेक्षा जास्त सिलेंडर किंवा 40 किलोग्रामपेक्षा जास्त एलपीजीचा साठा केल्यात प्रशासन कारवाई करू शकते.

साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊ शकतो

मर्यादेपेक्षा जास्त गॅस सिलिंडर घरात ठेवल्यास कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. जर एखाद्याकडे बेकायदेशीरपणे सिलेंडर ठेवलेले आढळले किंवा काळाबाजाराचा प्रकार समोर आला, तर त्याचे गॅस कनेक्शन रद्द केले जाऊ शकते आणि दंडही ठोठावला जाऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये हा गुन्हा अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत मानला जातो. या कायद्यानुसार दोषी आढळल्यास 3 महिन्यांपासून ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे घरी सिलिंडरचा साठा टाळावा.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल