AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder: बुकिंग करूनही गॅस सिलेंडर मिळाला नाही? इथे करा तक्रार, कंपन्यांचे हेल्पाईन नंबर काय?

LPG Cylinder Complaint: मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारतात अनेक ठिकाणी LPG सिलेंडरची बुकिंग आणि पुरवठ्यात अडचणी येत आहेत. गॅस सिलेंडरसाठी एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बुकिंग करूनही जर तुम्हाला गॅस मिळत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला तक्रार करता येईल.

LPG Cylinder: बुकिंग करूनही गॅस सिलेंडर मिळाला नाही? इथे करा तक्रार, कंपन्यांचे हेल्पाईन नंबर काय?
LPG Gas Cylinder ComplaintImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Mar 14, 2026 | 9:21 AM
Share

LPG Cylinder Complaint: मध्यपूर्वेतील युद्धादरम्यान घरगुती गॅसच्या (LPG) तुटवड्याने नागरिक हैराण झाले आहे. एकीकडे सरकार गॅस टंचाई नसल्याचा दावा करत असताना बुकिंग करूनही अनेकांना गॅस मिळत नसल्याचे समोर येत आहे. अनेक ठिकाणी जनतेत मोठी ओरड आहे. भल्या पहाटे पाच वाजेपासून एजन्सी कार्यालयाबाहेर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. ऑनलाईन बुकिंग करूनही, एजन्सीने दिलेल्या क्रमांकावर बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याची ओरड करण्यात येत आहे. वाढीव दर मोजा आणि चार पाच तास रांगेत थांबून गॅस मिळवा अशा कात्रीत ग्राहक अडकले आहेत. तुम्हाला जर बुकिंग करूनही गॅस सिलेंडर मिळत नसेल तर या क्रमांकावर तक्रार करता येईल.

बुकिंगचा कालावधी वाढला

देशातील LPG सिलेंडरच्या बुकिंगचा कालावधी 21 दिवसांनी वाढून 25 दिवस करण्यात आला आहे. ग्रामीण ग्राहकांसाठी हा कालावधी 45 दिवस करण्यात आला आहे. पण तरीही अनेक ठिकाणी तक्रारींचा ओघ आला आहे. काही गॅस डीलर सिलेंडर मुद्दाम उशीरा देत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. तर काही ठिकाणी एजन्सीचे डिलिव्हरी बॉय अतिरिक्त पैसे मागत असल्याची ओरड होत आहे. सिलेंडर बुक केल्यानंतर डिलिव्हरी वेळेत मिळत नसल्याचे, डीलर मनमानी करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशावेळी ग्राहक थेट तेल उत्पादक कंपन्यांकडे तक्रार करू शकतात.

HP गॅस हेल्पलाईन क्रमांक

HP Gas च्या ग्राहकांना तक्रार करण्यासाठी या क्रमांकावर संपर्क कराता येईल

1800-2333-555 (टोल फ्री)

9493602222 (HP Anytime LPG)

भारत गॅससाठी हेल्पलाईन क्रमांक

Bharat Gas ग्राहक सिलेंडर बुकिंगची तक्रार खालील क्रमांकावर करू शकतात.

1800-22-4344 (टोल फ्री)

7715012345 (LPG बुकिंग)

इंडेन गॅस ग्राहकांसाठी हेल्पलाईन क्रमांक

Indane Gas च्या ग्राहकांना या क्रमांकावर तक्रार करता येईल.

1800-2333-555 (टोल फ्री)

7718955555 (बुकिंग आणि तक्रार )

व्हॉट्सॲप असे करा बुकिंग

इंडेन: अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक 77189 55555 वर बुकिंगसाठी मॅसेज पाठव. ग्राहक WhatsApp वर मॅसेज पाठवू शकतात. LPG रिफिल असा संदेश लिहून गॅस बुकिंग करा. यावर सर्व अपडेट समोर येईल. ग्राहकांना ही सुविधा 24/7 उपलब्ध आहे. या आधारे पुढील प्रक्रिया सहज पूर्ण करता येते. पेमेंटही करता येते. ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

एचपी गॅस : 92222 01122 या क्रमांकावर HI हा संदेश पाठवून व्हॉट्सॲप सेवा सुरू करता येईल. त्यावर तुम्ही गॅस बुकिंगसंबंधीची पुढील प्रक्रिया आणि पेमेंट करू शकता.

Follow Us
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका? ठाकरे गटातील खासदार दिल्लीत
Sudhir Mungantiwar On Thackeray | ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका? ठाकरे गटातील खासदार दिल्लीत; फुटीच्या चर्चांनी राजकारण तापलं!
अचानक नाही, आधीपासूनच तयारी; थेट... ठाकरे गटातील फुटीबाबत विश्लेषकांचा
अचानक नाही, आधीपासूनच तयारी; थेट... ठाकरे गटातील फुटीबाबत विश्लेषकांचा मोठा दावा
पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला....
Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधक घेरणार!
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा फूट पडणार? काही खासदार थेट...
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!