AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देवसेने’ला भेटला खऱ्या आयुष्यातला ‘बाहुबली’? कोण आहे होणारा नवरा?

'बाहुबली' फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी लवकरच लग्नबंधनात अडकण्याच्या जोरदार चर्चा आहेत. दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानानंतर आता अनुष्का शेट्टी लवकरच मिसवरून मिसेस होणार असल्याचं कळतंय. अनुष्काचा होणारा पती कोण आहे त्याविषयी जाणून घेऊयात..

'देवसेने'ला भेटला खऱ्या आयुष्यातला 'बाहुबली'? कोण आहे होणारा नवरा?
Anushka ShettyImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 15, 2026 | 5:10 PM
Share

एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटातील देवसेना हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यांसमोर तिचं निळ्या साडीतील सौंदर्यवतीच्या तलबारजीचं दृश्य येतं. ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटातील तिच्या एण्ट्री सीनवर तर थिएटरमध्ये अक्षरश: टाळ्यांचा कडकडाट झाला होता. या चित्रपटानंतर अनुष्का आणि प्रभास यांच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि सर्वत्र त्यांच्या अफेअरच्या चर्चांनीही जोर धरला होता. परंतु अफेअरच्या चर्चा वारंवार अनुष्का आणि प्रभास दोघांनीही नाकारल्या होत्या. आम्ही दोघं फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं त्यांनी विविध मुलाखतींमध्ये स्पष्ट केलं होतं. त्यानंतरही प्रभास आणि अनुष्का यांच्या लग्नाच्या चर्चा होत राहिल्या. आता अनुष्काच्या विवाहसोहळ्य विषयी नवीन अपडेट समोर येत आहे आणि तिचा होणारा नवरा हा प्रभास नाही तर दुसरा कोणीतरी आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनुष्का लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ती 44 वर्षांची असून तिचे कुटुंबीय लग्नाची तयारी करण्यात व्यस्त झाले आहेत.

अनुष्का शेट्टीचा होणारा नवरा हा फिल्म इंडस्ट्रीतला नाही असं कळतंय. तिचा होणारा पती हा एक बिझनेसमन असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार तो अनुष्काचा फॅमिली फ्रेंड आहे. तो नेमका काय करतो आणि तो कोण आहे याबद्दलची माहिती अद्याप स्पष्ट नाही. गेल्या काही महिलांपासून अनुष्का शेट्टी लाइमलाइटपासून दूर आहे. 2025 मध्ये तिचा ‘घाटी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यापूर्वी ती ‘मिस शेट्टी मिस्टर पोलिशेट्टी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अनुष्काने दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकी प्रभाससोबत ‘बाहुबली 2’मधील देवसेनेच्या भूमिकेमुळे तिला प्रचंड स्टारडम मिळालं.

दोन वर्षांपूर्वी अनुष्का तिच्या बदललेल्या लूकमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. तिचं वाढलेलं वजन पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. ‘असं पाहून खूप वाईट वाटतंय. आम्हाला तुला अधिकाधिक चित्रपटांमध्ये पहायचंय. कृपया वजन कमी कर’, असं एका युजरने लिहिलं होतं. तर अनुष्का ही स्वत: योग प्रशिक्षक आहे, तिला फिटनेस आणि आरोग्याविषयी शिकवू नका, असा सल्ला तिच्या चाहत्यांनी ट्रोलर्सना दिला होता.

Follow Us
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या नेत्याचा पराभव करत दणदणीत विजय
दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर
Nashik Gite Vs Darade Rada | दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण सरदेसाई, 15 कोटी अन् बरंच काही...
नागपुरात भाजपचा झेंडा फडकला; राजीव पोतदार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का
Nagpur Vidhan Parishad Result | नागपुरात भाजपचा झेंडा फडकला; राजीव पोतदार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराड
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराडे म्हणाले, शिंदेच...
नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय
Nashik Gokul Gite | नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय, महायुतीला धक्का
अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात...
tv9 Marathi Special Report | अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात प्रवेश निश्चित
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!
Nagpur Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!; महायुतीचे वर्चस्व कायम राहणार की उलटफेर होणार?
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...