Krunal Pandya : क्रुणाल पांड्याचा झंझावात, 283 बॉलमध्ये 375 रन्स, मैदानाला आग लावली!

| Updated on: Mar 24, 2021 | 2:34 PM

पाठीमागच्या 5 मॅचेसमध्ये क्रुणालने 283 चेंडूत 375 रन्स ठोकलेत. भारतीय टीममध्ये डेब्यू करण्याआधी क्रुणाल विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत होता. | Krunal Pandya last 5 Match performance

Krunal Pandya : क्रुणाल पांड्याचा झंझावात, 283 बॉलमध्ये 375 रन्स, मैदानाला आग लावली!
Krunal pandya
Follow us on

पुणे : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पदार्पणवीर क्रुणाल पांड्याने (Krunal Pandya) कमालीची बॅटिंग केली. त्याने आपल्या बॅटिंगचा अप्रतिम नमुना सादर केला. त्याच्या खेळीत अनेक क्लास फटक्यांचा समावेश होता. त्याचा फूटवर्क तर एवढा खास होता की त्याला पाहिजे त्यावेळी तो फ्रंट फूटवर आला आणि पाहिजे तेव्हा बॅटफूटला जाऊन पंच मारले. याच कारणामुळे पहिल्याच मॅचमध्ये त्याने केवळ 26 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र क्रुणालने याच मॅचमध्ये अशी आक्रमक खेळी केली असं नाहीय तर मागील पाच सामन्यांवर नजर टाकली तर त्याची बॅट कशी बोललीय, याचा अंदाज येऊ शकतो….  (Krunal Pandya last 5 Match performance And Debut match Against england)

पाठीमागच्या 5 मॅचेसमध्ये क्रुणालने 283 चेंडूत 375 रन्स ठोकलेत. भारतीय टीममध्ये डेब्यू करण्याआधी क्रुणाल विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत होता. या टूर्नामेंटमध्ये क्रुणाल बडोदा संघाचा कर्णधार होता. खरंतर तो केवळ 5 सामने खेळला. त्याच्या वडिलांचं निध झाल्याने त्याला उर्वरित सामने खेळता आले नाही. परंतु या 5 मॅचमध्ये त्याने शानदार बॅटिंग केली.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये अखेरच्या चार मॅचमध्ये त्याने दोन शतकं आणि एका अर्धशतकाच्या साहाय्याने 375 रन्स ठोकले. त्याच्या याच बॅटिंग परफॉर्मन्सच्या जोरावर त्याला टीम इंडियामध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. 283 चेंडूमध्ये 54 चौकार आणि 7 षटकार लगावत 375 धावा ठोकल्या.

पाठीमागच्या पाच मॅचमध्ये क्रुणालच्या अफलातून इनिंग…

22 फेब्रुवारी- त्रिपुराविरुद्ध 97 चेंडूत 127 धावा
24 फेब्रुवारी- हैदराबादविरुद्ध 50 चेंडूत 55 धावा
26 फेब्रुवारी-छत्तीसगडविरुद्ध 100 चेंडूत 133 धावा
28 फेब्रुवारी-गुजरातविरुद्ध 2 धावा
23 मार्च- इंग्लंडविरोधात 31 चेंडूत 58 धावा

क्रुणालचं पदार्पणात वेगवान अर्धशतक

कृणालने एकदिवसीय पदार्पणात वेगवान अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. कृणालने इंग्लंडच्या जॉन मॉरीस यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. मॉरीस यांनी 1990 मध्ये 35 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. तर कृणालने 26 चेंडूत वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. कृणालने एकूण 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 58 धावांची खेळी केली.

(Krunal Pandya last 5 Match performance And Debut match Against england)

हे ही वाचा :

Ind Vs Eng : क्रुणाल पांड्या आणि टॉम करनमध्ये असं काय झालं?, ज्यामुळे विराट कोहलीही हैरान, पाहा व्हिडीओ…