AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Eng : क्रुणाल पांड्या आणि टॉम करनमध्ये असं काय झालं?, ज्यामुळे विराट कोहलीही हैरान, पाहा व्हिडीओ…

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली वन डे मॅच सुरु असताना क्रुणाल आणि इंग्लंडचा खेळाडू टॉम करनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. krunal Pandya And tom Curran

Ind Vs Eng : क्रुणाल पांड्या आणि टॉम करनमध्ये असं काय झालं?, ज्यामुळे विराट कोहलीही हैरान, पाहा व्हिडीओ...
krunal Pandya And tom Curran heated Argument Virat kohli reply
| Updated on: Mar 24, 2021 | 1:24 PM
Share

पुणे :  भारतीय संघाचे शिलेदार क्रुणाल पांड्या (krunal Pandya) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh krushna) यांचा पदार्पणाचा सामना खास ठरला. पांड्याने केवळ 31 चेंडूत 58 धावा केल्या तर प्रसिद्धने इंग्लंडच्या 4 विकेट्स घेऊन भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दरम्यान मॅच सुरु असताना क्रुणाल आणि इंग्लंडचा खेळाडू टॉम करनचा (tom Curran) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत दोघांमध्ये कसला तरी वाद सुरु असल्याचं दिसत आहे. (krunal Pandya And tom Curran heated Argument Virat kohli reply)

काय आहे व्हिडीओमध्ये?

भारताची बॅटिंग सुरु होती. क्रुणाल पांड्या रंगात आला होता. त्याच्या बॅटमधून आक्रमक फटके निघत होते. क्रुणालच्या साथीला के.एल. राहुल होता. दोघांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे काढली होती. याचवेळी क्रुणालने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि बोलिंग मार्कजवळ असलेल्या करनला काहीतरी म्हटलं. प्रत्युत्तरादाखल करननेही पांड्याला उत्तर दिलं. यानंतर पांड्या बराच वेळ करनकडे पाहत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करु लागला. साहजिक मैदानी पंच नितीन मेनन यांचा यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.

इंग्लंडचा स्टँड इन कर्णधार जॉस बटलर देखील तिथे पोहोचला. त्यानेही पांड्याला काहीतरी सुनावलं. याचवेळी डगआऊटमध्ये बसलेल्या विराटवर कॅमेरा गेला. मैदानात काय घडतंय हे काहीच कळायला मार्ग नसल्याने विराटही हैरान होऊन फक्त पाहत होता. त्याला अखेपर्यंत समजलं नाही की नेमकं मैदानावर का घडतंय?

त्या वाईड बॉलमुळे तर राडा नाही..??

व्हिडीओवरुन हे तर स्पष्ट होतंय की क्रुणाल आणि करनमध्ये तू तू मैं मैं झाली. करनच्या त्याच ओव्हरमध्ये अंपायरने एक बॉल वाईड दिला होता. अंपायरचा निर्णय करनला आवडला नव्हता. तो अंपायरच्या निर्णयावर नाखूश होता. त्याचवेळी क्रुणालतो करन काही तरी बोलला. ज्याचं उत्तर क्रुणालने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर दिलं.

एकदिवसीय क्रिकेटमधली आपली पहिली मॅच खेळणाऱ्या क्रुणालने पदार्पणात सर्वाधिक जलद अर्धशतक ठोकण्याचा न्यूझीलंडच्या फलंदाजाचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. पांड्याने केवळ 31 चेंडूत 58 धावा केल्या. न्यूझीलंडच्या जॉन मॉरिसने 35 चेंडूत पदार्पणात अर्धशतक ठोकलं होतं.

(krunal Pandya And tom Curran heated Argument Virat kohli reply)

हे ही वाचा :

… तर तू असंच केलं असतं का?, वीरेंद्र सेहवागचा विराट कोहलीवर गंभीर आरोप, मॅच जिंकूनही वीरु भडकला!

प्रसिद्ध कृष्णाने उधळले पाहुण्या इंग्लंडचे मनसुबे, पण त्याचा आयडॉल कोण?, त्याला कसा बोलर व्हायचंय?, वाचा त्याने काय सांगितलं…

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.