… तर तू असंच केलं असतं का?, वीरेंद्र सेहवागचा विराट कोहलीवर गंभीर आरोप, मॅच जिंकूनही वीरु भडकला!

भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने कर्णधार विराट कोहलीवर संघ निवड करताना भेदभाव करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. | Virendra Sehwag Virat kohli

... तर तू असंच केलं असतं का?, वीरेंद्र सेहवागचा विराट कोहलीवर गंभीर आरोप, मॅच जिंकूनही वीरु भडकला!
Virendra Sehwag And virat kohli
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 11:55 AM

पुणे : भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंडला (India Vs England) पुण्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात 66 धावांनी पराभूत केलं. मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाहुण्यांना गुडघे टेकायला लावले. मात्र अशा परिस्थितीत देखील कर्णधार विराट कोहलीवर (Virat kohli) आरोप सुरुच आहेत. भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने (virendra Sehwag) कर्णधार कोहलीवर गंभीर आरोप केला आहे. संघाची निवड करताना किंबहुना अंतिम 11 जणांची निवड करताना कोहली भेदभाव करत असल्याचा सनसनाटी आरोप वीरेंद्र सेहवागने केला आहे. (Virendra Sehwag Slam Virat kohli over Kl Rahul jasprit bumrah And Yujvendra Chahal)

के.एल. राहुलला संधी मग युजवेंद्र चहलला संधी का नाही?

गेल्या काही मॅचेसमध्ये सातत्याने अपयशी ठरणाऱ्या के.एल.राहुलला विराट संधी देत आहे तसंच त्याच्याट संघातील जागेवरुन त्याची पाठराखण करत त्याचं कौतुकही करत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला फिरकीपटू युजवेंद्र चहलला मात्र भेदभावाची वागणूक मिळत आहे. एक-दोन मॅचेसमध्ये खराब कामगिरी केल्याबरोबर त्याला संघातून वगळण्यात येत आहे.

वीरेंद्र सेहवागने ‘क्रिकबज’शी बोलताना चहलसाठी तुफान बॅटिंग केली. तो म्हणाला. आपण एका गोलंदाजाला एक-दोन मॅचेसमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर पुन्हा संधी देत नाही. दुसऱ्या बाजूला आपण के.एल.राहुलला चार संधी देता. गोलंदाजांसाठीही काही मॅच खराब जाऊ शकतात, त्यांना पुन्हा संधी दिली पाहिजे.

जर चहलच्या जागी जसप्रीत बुमराह असता आणि त्याने जर तीन-चार मॅचेसमध्ये खराब कामगिरी केली असती तर त्याला काय संघाबाहेर ठेवलं असता का?, असा सवाल सेहवागने विराटला विचारला आहे. आपण फक्त एवढंच म्हणता की तो एक चांगला गोलंदाज आहे, तो संघात नक्की पुनरागमन करेल, असं चालत नाही.

के.एल. राहुलला सूर गवसला

गेल्या काही मॅचेसमध्ये के.एल. राहुल फ्ल़ॉप ठरला होता. काही केल्या त्याच्या बॅटमधून रन्स येत नव्हते. यामुळे टीकाकारांच्या हातात आयतच कोलित मिळालं होतं. मात्र पुण्यात पहिल्या एकदिवसीय सामन्यात राहुलने आक्रमक अर्धशतक झळकावत पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगची जादू दाखवली तसंच जुन्या अंदाजात बॅटिंग करत टीकाकारांची तोंडं बंद केली.

भारताचा 66 धावांनी विजय

टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या सामन्यात 66 धावांनी शानदार विजय मिळवला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव 251 धावांवर आटोपला. या सामन्यात टीम इंडियाच्या पदार्पणवीरांनी विजयी कामगिरी केली. प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पंड्या या दोघांनी अफलातून खेळी केली. या दोघांनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली.

हे ही वाचा :

कोहली जडेजासोबत वर्ल्डकप जिंकला, मुंबईकडून सर्वाधिक सिक्सर, ‘डावखुरा धोनी’ म्हणून ओळख पण 3 मॅचमध्ये करिअर संपलं…

India vs England 1st Odi | इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पंड्याची शानदार कामगिरी

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.