IPL Auction 2023: बीसीसीआयकडून नोंदणीची अंतिम तारीख जाहीर केली, दोन दिग्गज खेळाडूंची नाव नोंदणी

| Updated on: Nov 24, 2022 | 12:25 PM

15 डिसेंबर पुर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे

IPL Auction 2023: बीसीसीआयकडून नोंदणीची अंतिम तारीख जाहीर केली, दोन दिग्गज खेळाडूंची नाव नोंदणी
IPL 2023
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या (IPL) 16 व्या सीजनची तयारी आतापासून सुरु झाली आहे. कोणत्या खेळाडूला कोणत्या टीमने कायम ठेवून घेतले आहे हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. तसेच ज्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्या खेळाडूंसाठी डिसेंबर (December) महिन्यात लिलाव होणार असल्याचे बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले आहे. खेळाडूंची अंतिम नोंदणी करायची तारिख 15 डिसेंबर आहे.

डिसेंबरच्या 23 तारखेला खेळाडूंचा हंगामी लिलाव होणार असल्याची माहिती बीसीसीआयने जाहीर केली आहे. सैम करन, बेन स्टोक्स, आणि कैमरन ग्रीन इत्यादी खेळाडूंनी मागच्या काही दिवसात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हे खेळाडू अनेक टीमच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे.

ज्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यांनी 15 डिसेंबर पुर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर सुरुवातीला 23 तारखे हंगामी लिलाव होईल. इंग्लंडच्या जो रूट आणि बेन स्टोक्स या दोन खेळाडूंनी नोंदणी केल्याची माहिती मिळाली आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक मोठ्या टीममध्ये बदल पाहायला मिळणार आहे. चेन्नई टीममध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. अनेक युवा खेळाडूंना यावेळी मोठ्या टीमने संधी दिली आहे. त्यामुळे यंदाचं आयपीएल चाहत्यांसाठी खास असणार आहे.