MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी आता दाखवणार फिल्मी दुनियेत जलवा

धोनी एका नव्या चित्रपटात दिसणार असल्याची मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा आहे.

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी आता दाखवणार फिल्मी दुनियेत जलवा
ms dhoni
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 10, 2022 | 12:40 PM

महेंद्रसिंग धोनीला (MahendraSing Dhoni) आत्तापर्यंत क्रिकेट (Cricket) खेळताना पाहिलं आहे. त्याचबरोबर त्याला आवडतं असलेल्या काही गोष्टी करताना पाहिलं आहे. पण धोनीने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने स्वत:चं प्रॉडक्शन हॉऊस (Production House) सुरु केलं आहे. त्यामुळे तो लवकरचं फिल्मी दुनियेत दिसण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

धोनी एका नव्या चित्रपटात दिसणार असल्याची मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा आहे. कारण त्याने एका साऊथ अभिनेत्याशी बोलणं देखील केलं आहे. त्यामुळे त्याची स्टोरी काय असणार, धोनी काय काम करणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

हा स्टुडिओ तीन भाषांमध्ये सुरु होणार आहे, त्यामध्ये तमिल, तेलुगू और मलयालम भाषांचा समावेश आहे. कारण आयपीएल खेळत असताना महेंद्रसिंग धोनीचे तिथं अनेक चाहते झाले आहेत.

धोनीचे चित्रपट साऊथमध्ये अधिक चालतील असं साऊथच्या काही मान्यवरांचं मत आहे. पण प्रॉडक्शन हॉऊस सुरु केल्यापासून सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे.