बाप, ती आणि सेक्स… 50 चं दशक हादरवून सोडणाऱ्या लोलिताचा 70 वर्षानंतर बॉम्ब; काय आहे Lolitaची कहाणी?
वादग्रस्त Apstien Files मुळे चर्चेत आलेली 'लोलिता' कांदबरीने त्या काळात इतके वादळ निर्माण केले होते की अमेरिकेतील लोकांनी आपल्या मुलीचे नाव लोलिता ठेवणे देखील बंद केले होते.

लोकांनी आपल्या मुलीचे नाव लोलिता ठेवणे बंद केले होते. तर जेफ्री जेफ्री एपस्टीन ( Jeffrey Apstien ) याने त्याच्या प्रायव्हेट जेटचे नाव लोलिता एक्सप्रेस ठेवले होते. अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्सचे डेमोक्रेट्सने एपस्टीन फाईल्सचे (Apestien Files) जे फोटो जारी केले आहेत. त्यात वादग्रस्त कांदबरी लोलिता दिसत ( Lolita ) आहेत.
अमेरिकेचे कुख्यात एपस्टीन सेक्स स्कँडल ( Apstien Sex Scandal ) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एपस्टीन फाईल्सने देश आणि जगातील अनेक मोठ्या नावांची झोप उडविली आहे. अनेक फोटो जारी झाले आहेत आणि आणखी फोटो येणे बाकी आहे. या दरम्यान दोन नावे अशी आहेत जी मीडियात गाजत आहेत. पहिले जेफ्री एपस्टीन आणि दुसरे नाव लोलिता आहे.
जेफ्री एपस्टीन हे अमेरिकेतील मोठे नाव होते. मोठ-मोठ्या हस्ती त्यांचे मित्रयादीत होते. इनवेस्टमेंट मॅनेजर म्हणून वावरणारे जेफ्री एपस्टीन यांना अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि सेक्स ट्रॅफिकींगच्या गंभीर आरोपाखाली अमेरिकत अटक झाली होती. जुलै २०१९ मध्ये न्युयॉर्कच्या तुरुंगात जेफ्री एपस्टीन यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला.
दुसरे नाव होते लोलिता (Lolita).लोलिता एक काल्पनिक नाव आहे. साल १९५५ मध्ये या नावाची कांदबरी प्रसिद्ध झाल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. या कांदबरीवर रशिया आणि फ्रान्स सारख्या देशांनी बंदी घातली होती. लोलिता जगातील सगळ्यात वादग्रस्त कांदबरी म्हणून ओळखली जाते.
ही कांदबरी प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांनी त्यांच्या मुलीचे नाव लोलिता ठेवणे बंद केले होते. तर जेफ्री एपस्टीन याने त्याच्या प्रायव्हेट जेटचे नाव लोलिता एक्सप्रेस ठेवले होते. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटीव्सच्या डेमोक्रेट्सने एपस्टीन फाईल्सचे जे फोटो जाही केली त्यात ही वादग्रस्त कांदबरी लोलिता दिसत आहे.
लोलिता आणि वाद :
लोलिता रशियाचे लेखक व्लादिमीर नाबोकोव यांची सर्वात चर्चित कांदबरी आहे. नाबोकोव्ह यांनी १९५४ मध्ये त्यांची ही कांदबरी लिहून पूर्ण केली. ही कांदबरी लिहिल्यानंतर ती प्रसिद्ध होणार नाही अशी भिती लेखकाला वाटू लागली. त्यांच्या भीतीचे कारण म्हणजे या कांदबरीची कथा होती. कारण या कांदबरीचे मुख्य पात्र एक म्हातारपणाकडे झुकलेला व्यक्ती आहे. हम्बर्ट नावाचा हा व्यक्ती डोलोरेस हेज (लोलिता) नावाच्या आपल्या सावत्र मुलीच्या प्रती वासना, कामुकतेचे विचार ठेवणारा आहे. अवघ्या १२ वर्षांच्या लोलिताला तो झोपताना, जागताना स्वप्नात पाहात असतो आणि कोणत्याही परिस्थिती तिला मिळवू इच्छीत असतो.
व्लादिमीर नाबोकोव याची भीती योग्यच ठरली अनेक प्रकाशकांनी कांदबरीचा विषय ऐकताच नकार दिला. अनेक प्रयत्नांनंतर ही कांदबरी अखेर १९५५ मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये प्रसिद्ध झाली. ओलंपिया प्रेसने ती प्रकाशित केली. ती अश्लिल कांदबरी म्हणून प्रसिद्ध झाली आणि मार्केटमध्ये येताच खळबळ उडाली.
लोलिता प्रकाशित होताच खळबळ
काहींनी लोलिताला एक वेगळ्या प्रकारचे उत्कृष्ट साहित्य म्हणून गौरव केला. कर मोठ्या संख्येने यास उच्चस्तरातील अश्लिलता पसरवण्याचा आरोप केला. लोलितावर चाईल्ड पोर्नोग्राफीचा स्टँप लागला.लोक म्हणाले की लोलिता एक पेडोफाईलच्या कृत्यांना ग्लॅमराईज करते.
लोलितावर रशिया, फ्रान्सने बंदी घातली. त्यानंतर अर्जेंटीना, न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रीकेने लोलिताचे प्रकाशन आणि विक्री दोन्हींवर बंदी घातली. ब्रिटनमध्ये या कांदबरीला प्रकाशित करणाऱ्या कंजर्वेटिव पार्टीचे खासदार निगेल निकोलसन यांना त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.
लोलितामुळे ११ वर्षांच्या मुलीचे शोषण!
लोकांनी लोलितावर आरोप लावला गेला की लहान मुलींबद्दल विकृत मानसिकतेला प्रोत्साहन देणारी ही कांदबरी आहे. ही कांदबरी प्रकाशित झाल्यानंतर काही वर्षांनी अमेरिकेच्या कॅमडेन शहरात ११ वर्षांची सॅली हॉर्नर एका दुकानात नोटबुक चोरताना पकडली गेली. दुकानदार फ्रँक ला याने तिला आपण एफबीआयचे एजंट असल्याचे सांगत तिला जेलमध्ये नेणार असल्याचा धाक दाखवत त्यातून वाचण्याच्या बदल्यात तिचे २१ महिने लैंगिक शोषण केले. तो अनेक शहरात तिला घेऊन फिरत होता आणि ती आपली मुलगी असल्याचे सर्वांना भासवत होता.
ही सत्य घटना सारा वेनमॅन यांनी त्यांच्या ‘द रिअल लोलिता’ नावाच्या अन्य एका कांदबरीतून जगासमोर आणली. सॅली हॉर्नरच्या लैंगिक शोषणाला सारा वेनमॅन हीने लोलिता कांदबरीतून प्रभावित असल्याचे सांगितले. मात्र, लोलिता कांदबरीचे लेखक नाबाकोवा यांनी आपल्या कांदबरीचा बचाव करताना ही सत्य घटना नसल्याचे सांगितले.
जेव्हा भारतात पोहचली लोलिता –
लोलिता कांदबरी १९५९ मध्ये भारतात आली, मुंबईतील जयको पब्लिशिंग हाऊसने तिच्या अनेक प्रती आयात केल्या. मात्र ही मुंबईच्या कस्टम कलेक्टरनी अश्लिल सामुग्री म्हणून याची चौकशी सुरु केली.
अभिनव चंद्रचूड यांच्या ‘रिपब्लिक ऑफ रेटोरिक -फ्री स्पीच एंड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया’ या पुस्तकानुसार मुंबईतून प्रकाशित होणारे साप्ताहिक ‘करंट’ चे संपादक डीएफ कराका यांनी तत्कालिन अर्थ मंत्री मोरारजी देसाई यांना पत्र लिहून या कांदबरीवर बंदी आणण्याची मागणी केली. मोरारजी देसाई यांनी हे पत्र गृहमंत्रालयाकडे पाठवून दिले. ही सेक्स विकृती असल्याचे सांगून तिच्यावर बंदीची मागणी त्यांनी केली.
प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नायर यांनी त्यांच्या ‘बियॉन्ड द लाइन्स – एन ऑटोबायोग्राफी’ मध्ये लिहीलंय की लालबहादूर शास्री देखील लोलितावर बंदी आणण्याची मागणी केली होती. काँग्रेसच्या कोणा नेत्याने ही कांदबरी आताच पुस्तकांच्या दुकानात आली असून ती इतकी अश्लिल आहे की त्यावर बंदी आणली पाहिजे अशी मागणी त्यांच्याकडे केली.लालबहादूर शास्री यांनी यासंदर्भात पंतप्रधान पंडीत नेहरुंना पत्रही लिहीले.मात्र लोलितावर भारतात बंदी झाली नाही.
लोलितावर अनेक आरोप असले तरी तिला वाचवणाऱ्यांची संख्याही देखील कमी नव्हती. या कांदबरीच्या ६ कोटीहून अधिक प्रती विकल्या गेल्या. जेव्हा पहिल्यांदा ही कांदबरी छापली गेली तेव्हा तीन दिवसात सर्व प्रती संपल्या. कंपनीला पुन्हा छापाव्या लागल्या. अमेरिकेत लोलिता बेस्ट सेलर ठरली.
हॉलीवूडने देखील फायदा घेतला
हॉलीवूडने लोलितावर दोन चित्रपट काढले. एक लोलिता नावानेच १९६२ मध्ये आला. त्याचे दिग्दर्शन स्टेनली कुब्रिक यांनी केले. हा चित्रपट आजही क्लासिक मानला जातो. दुसरा चित्रपट १९९७ मध्ये एड्रीयन लाईन यांनी काढला. जेरेमी आयरन्स आणि डोमिनिक स्वॅन यांनी त्यात काम केले होते. लोकांना हा चित्रपटही आवडला.
प्रसिद्ध मॅगझिन प्लेबॉयला दिलेल्या मुलाखतीत लेखक नाबोकोव यांनी सांगितले की मला लोलितावर कधीच पश्चाताप झाला नाही. मी साहित्य लिहिले आहे. कोणतीही पोर्नोग्राफी नाही. नाबोकोव यांची कांदबरी इंग्रजी साहित्यातील अमूल्य मानली जाते. काहीही असो ७० वर्षांनंतरही ही कांदबरी लोकांना बैचेन करते कदाचित हाच तिचा युएसपी आहे.
