तिचा 10 मिनिटांचा न्यूड व्हिडीओ, नंतर ब्लॅकमेलिंग, अखेर लग्नानंतर वधूने जे केले ते…
सोशल मीडियाद्वारे एका तरुणीच्या नादाला लागल्याने एका तरुणाची मोठी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या तरुणाची भेट सोशल मीडियावर चॅटींगद्वारे झाली आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंग ते लाखोची खंडणी असा प्रवास लग्नापर्यंत पोहचला...परंतू अखेर तरुणाची मोठी फसगत झाली.

सोशल मीडियाद्वारे सुरु झालेले त्यांचे नाते त्या युवकाच्या जीवनातील सर्वात मोठे फसवणूकीचे प्रकरण ठरले आहे. ट्वीटरवर फेस कव्हर न्यूड व्हिडीओ दाखवण्याच्या सुरु झालेली चॅटींग अखेर ब्लॅकमेलिंग, लाखो रुपयांची खंडणी आणि नंतर जबरदस्ती लग्नापर्यंत पोहचली. लग्नानंतर या तरुणीने लागलीच युवकांची कॅश आणि दागिने घेऊन फरार झाली आहे. पीडीत नवरोबा आता न्यायाची मागणी मागणी करीत पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत आहे.
आंध्रप्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील भरत कुमार असे या पीडीत तरुणाचे नाव आहे. २७ वर्षांच्या भरत एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतो. भरत कुमारे याने सांगितले की साल २०१९ मध्ये आधी त्याला एक्स ( आधी ट्वीटर ) एका तरुणीचा संदेश आला. ज्यात तिने मजबूरीमुळे आपल्या न्यूड व्हिडीओ विकावा लागत असल्याचे सांगितले होते. आणि दहा मिनिटांचा हा व्हिडीओ एक हजार रुपयांच्या बदल्यात दाखवण्याचे लालूच दाखविली.
नंतर ब्लॅकमेलींग सुरु
भरत कुमार या तरुणीच्या जाळ्यात अडकला. आणि टेलिग्रामवर फेस कव्हर न्यूड व्हिडीओ पाहू लागला. त्यावेळी स्क्रीनशॉट घेऊन या तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करण्यात आली. या तरुणीने हळूहळू लाखो रुपये या तरुणाकडून उकळले.
ब्लॅकमेलिंगच्या दबावात या तरुणीने लग्नाची अट टाकली. नंतर २०२१ मध्ये दोघांची लखनऊ आणि गोरखपूर येथे भेट झाली. त्यानंतर २०२३ मध्ये ही तरुणी हैदराबादला पोहचली. आणि आत्महत्येची धमकी देऊन लग्न करण्यास तिने भाग पाडले. मार्च २०२५ मध्ये दोघांनी मंदिरात लग्न केले आणि कोर्ट मॅरेज करुन विवाहाची नोंदणी केली.
लग्नाचा दबाव आणि गंडा घातला
लग्नाच्या दोन महिन्यानंतर तरुणीचा खरा चेहरा समोर आला. ती अन्य एका युवकासोबत बोलू लागली. आणि ४० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर देखील केले. चौकशी कळले की दुसरा व्यक्ती तिचा आधीचा पती होता. आणि पीडीत तरुणाशी तिचा तिसरा विवाह झाला होता.
रोख- दागिने घेऊन फरार
त्यानंतर ही तरुणी चार लाख रुपये रोकड आणि दागिने घेऊन देवरिया येथे पोहचली. पीडीत तरुणाने अखेर देवरिया पोलिस गाठले. एडीशनल एसपीने घटना आणि विवाह आंध्रप्रदेशातील असल्याने तेथे केस दाखल करण्याचा सल्ला दिला. पीडीताची तक्रार लिहून घेण्यात आली आहे. पीडीत तरुणाने या युवतीवर सोशल मीडियावर लोकांना फसवणे, लग्न करणे आणि ब्लॅकमेल करुन पैसे लुबाडणे हाच तिचा धंदा असल्याचा आरोप केला आहे. तसेच या तरुणीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या तरुणावर केली आहे.
